दिवाळीच्या पूर्वसंध्येला हरवलेले 2लाख70 हजार रुपये किमतीचे 18 मोबाईल नवीन कामठी पोलिसांनी नागरिकांना केले परत

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-दिवाळी सणाच्या पाश्वरभूमीवर पोलिसांनी नागरिकांचा आनंद केला द्विगुणित

-मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी नवीन कामठी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.

कामठी :- मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, की तो परत मिळण्याची शक्यता कमी असते. मात्र नवीन कामठी पोलिसांनी हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना दिवाळीच्या पूर्वसंध्येला परत केले आहेत. मोबाईल फोन सारख्या लहान गोष्टींचा शोध घेण्यास वेळ लागतो. मात्र नवीन कामठी पोलीस स्टेशन च्या सायबर पथकातील पोलिसांनी अंदाजित 2 लक्ष 70 हजार रुपये किंमतीचे 18 मोबाईल फोनचा शोध घेऊन तक्रारदार आणि मूळ मालकांना ते परत केले आहेत.

नवीन कामठी पोलीस स्टेशनच्या सायबर पथकातील पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी हरवलेल्या, गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती घेत विशेष मोहीम राबवून तांत्रिक कौशल्यावर तपास करत चोरी गेलेले मोबाईल हस्तगत केले. गेलेला मोबाईल परत मिळेल, ही आशाही अनेकांनी सोडून दिली होती. त्यामुळे हरवलेला मोबाईल मिळाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता. मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी नवीन पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.

मोबाईल ही नागरिकांसाठी महत्वाचा विषय असतो. चोरी गेल्याने आर्थिक नुकसान तर होतेच शिवाय अनेकांचा महत्वाचा डाटाही जातो. त्यामुळे यासंबंधित नागरिकांच्या भावना वेगळ्या असतात. मोबाईलची कधी चोरी होते, तर कधी हरवतो. पोलिसांकडून दाखला मिळवून नवे सिमकार्ड मिळवून अनेक जण नवा मोबाईल सुरू करतात. असे असले तरी त्यांच्या दृष्टीने हरवलेला किंवा चोरी गेलेला मोबाईल तेवढाच महत्वाचा असतो. त्याचा शोध घेता येत नाही, तक्रारही नोंदवून घेतली जात नाही, यामुळे पोलिसांबद्दल नागरिकांचे मत खराब होते. तर दुसरीकडे चोरांचे धाडस वाढते. त्यामुळे अशा घटना वाढत असल्याचे ओळखून वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी सायबर पथक निर्माण करून पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे सह खास मोहीम राबविण्याचे ठरविले. आपल्या सर्व सहकाऱ्यांना सूचना केल्या. त्यांना कामे वाटप केले.दरम्यान पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे व सहकाऱ्यांनी तांत्रिक मदत आणि पारंपरिक तपास पद्धतीचा अवंलब करून विशेष मोहिमेत त्यांनी मोबाईल परत मिळविण्यास यश मिळविले.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार , पोलीस उपायुक्त श्रवनकुमार दत्त, सहायक पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे, पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे, पोलीस संदीप सगणे,, कमल कनोजिया,हेमचंद्र सोनोने यांनी मोलाची कामगिरी केली आहे.

NewsToday24x7

Next Post

बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह परिसरातून 21 वर्षीय तरुणी बेपत्ता

Mon Nov 13 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह परिसर राहिवासी 21 वर्षोय तरुणी ही दिवाळी च्या एक दिवसापूर्वी मध्यरात्री तीन दरम्यान घरून निघून गेली मात्र बराच वेळ होउम घरी परतली नाही यासंदर्भात घरमंडळींनी शोधाशोध करूनही कुठेही थांगपत्ता लागलेला नाही.अखेर यासंदर्भात पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंगची नोंद करून घेतली आहे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com