संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी नगर परिषद हद्दीतील कोळसा टॉल येथील 425क्षेत्रफळ स्थावर मालमत्तेच्या जागेच्या एका नझुल घराचा सौदा एकूण 13 लक्ष रुपयाने विक्री करण्याचा नोट्रराईज सौदा केला व घरविक्री चा सौदा करणाऱ्या इसमाने घरखरेदी करणाऱ्या इसमाकडून नगदी 5 लक्ष रुपये घेतले.ही घटना 17 जुलै 2023 मध्ये घडली होती.मात्र कालांतराने या सौदा व्यवहारात झालेल्या मतभेदातुन सदर झालेला विक्री सौदा हा घरविक्री चा नसून घराच्या तळमजल्यावरील 8*8 क्षेत्रफळ स्थावर मालमत्तेचे जागेवर असलेले दुकान विक्री करण्याचा सौदा केल्याचे सांगण्यात आले.यावर खरेदीदाराने झालेल्या सौंदयात स्वीकारलेले रक्कम 5 लक्ष रुपये परत मागण्याचा प्रयत्न केला असता पैसे परत करण्यास टाळाटाळ करीत असल्याने स्वताची फसवणूक झाल्याचे गृहीत धरून न्यायिक हक्कासाठी पोलीस स्टेशन ला धाव घेतलेले फिर्यादी एजाज अहमद अब्दुल वारी वय 55 वर्षे रा नया बाजार कामठी ने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून आरोपी फारूक अहमद सिराज अहमद वय 38 वर्षे रा कोळसा टॉल कामठी विरुद्ध भादवी कलम 420 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.