नागपुर ग्रामीण जिल्हयात तसेच लगतचे जिल्हात तसेच राज्यात घरफोडीचे गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार १५,४४,४००/- रू. या सोने चांदीच्या दागिन्यांसह गजाआड

स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण ची कारवाई

नागपुर :-पोलीस अधीक्षक नागपूर ग्रमीण विशाल आनंद यांनी नागपूर ग्रामीण हद्दीत वाढत्या घरफोडीचे गुन्हयांना आळा बसण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सक्त सूचना निर्गमित केल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा ना.ग्रा. यांचे विविध पथक तयार केले.

दिनांक ०३/०७/२०२३ रोजी पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालमत्तेसंबंधी गुन्हयाचा समांतर तपास संबंधाने फिरत असतांना पोलीस ठाणे बुट्टीबोरी अप. क्र. ४३४/२३ कलम ४५४, ४५७, ३८० भा.द.वी. या गुन्या संबंधाने अट्टल गुन्हेगार गोपाल उर्फ बोरू दुजेराम देवांगन, वय ३० वर्ष, रा. भिलाई, दुर्ग छत्तीसगढ़ यास सापळा रचुन ताब्यात घेत विचारपूस केली असता त्या दरम्यान त्याने वरील नमूद गुन्हा केल्याचे सांगितले. पुढे अधिक विचारपूस दरम्यान त्याने बुट्टीबोरी, MIDC बोरी, मौदा, गोंदिया शहर, राजनांदगाव येथे अशाच प्रकारे घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे सांगितले. त्यावरुन त्याचे ताब्यातून सदर गुन्ह्यातील तसेच इतर गुन्ह्यातील चोरी केलेले सोने चांदीचे दागिने पंचासमक्ष ताब्यात घेऊन जप्त करण्यात आले. आरोपीने असे एकुण ०७ गुन्हयांची कबुली दिली..

उडकीस आलेले गुन्हे

१) पोलिस ठाणे बट्टीबोरी ४३४/२३ कलम ४५४, ४५७, ३८० भादवि.

२) पोलिस ठाणे बुट्टीबोरी ३६८ / २३ कलम ४५७, ३८० भादवि

(३) पोलिस ठाणे MIDC बुट्टीबोरी २११ / २३ कलम ४५७, ३८० भादवि.

४) पोलिस ठाणे MIDC बुट्टीबोरी २२५ / २३ कलम ४५४, ४५७, ३८० भादवी

५) पोलिस ठाणे मौदा ३१९ / २३ कलम ४५७, ३८० भादवी

६) पोलिस ठाणे गोंदिया शहर २७७ २३ कलम ४५४, ४५७, ३८० भादवी

७) पोलिस ठाणे सोमनी (छ. ग.) ८०/२३ कलम ४५४, ४५७, ३८० भादवी

अशा एकुण ०७ गुन्हयातील नागपूर ग्रामीण जिल्हयातील खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. १) एकूण अंदाजे २९५ ग्रॅम १४,४१,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने २) एकूण २०८४ ग्रॅम १,०१,६००/- रुपये किंमतीचे चांदीचे दागिने व इतर साहित्य एकुण १५.४४,४०० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीची वैद्यकिय तपासणी करून संबंधित कागदपत्रे व जप्त मुद्देमाल सह पुढील कायदेशीर प्रक्रियेकरिता पोलीस स्टेशन बुट्टीबोरी यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण)  विशाल आनंद (भा.पो.से.) तसेच अपर गोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक अशिपसिंह ठाकुर, पोलीस उपनिरीक्षक आशीष मोरखडे, सहायक फौजदार चंद्रशेखर बडेकर, पोलीस हवालदार महेश जाधव, मिलिंद नांदुरकर, अरविंद भगत, मयूर ढेकळे, निलेश बर्वे, पोलीस नायक रोहन डाखोरे, अमृत किनगे, बालाजी साखरे, सतिष राठोड महिला पोलीस नायक वनिता शेंडे चालक सुमित बांगडे, आशुतोष लांजेवार यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरफोडीचा गुन्हा उघडकीस, दोन आरोपींना अटक

Wed Jul 5 , 2023
नागपूर :- पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत, फ्लॅट नं. ०२, मंगलम सोसायटी, विजय नगर, नारा, नागपुर येथे राहणारे फिर्यादी सतिष बाबुलाल नागले, वय ३८ हे कामावर गेले आणि फिर्यादी यांची पत्नी घराला कुलूप लावुन माहेरी गेल्या असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे घराच्या दाराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून, घरातील बेडरूम मधील लाकडी कपाटातून सोन्याचे दागीने व नगदी ४०,०००/-रू, असा एकुण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com