नागपूर :- पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत, फ्लॅट नं. ०२, मंगलम सोसायटी, विजय नगर, नारा, नागपुर येथे राहणारे फिर्यादी सतिष बाबुलाल नागले, वय ३८ हे कामावर गेले आणि फिर्यादी यांची पत्नी घराला कुलूप लावुन माहेरी गेल्या असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे घराच्या दाराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून, घरातील बेडरूम मधील लाकडी कपाटातून सोन्याचे दागीने व नगदी ४०,०००/-रू, असा एकुण १,५२,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे जरीपटका येथे अज्ञात आरोपी विरूद कलम ४५४, ४५७ ३८० भादवि अन्वये गुन्हा नोंद होता.
सदर गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा, घरफोडी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशिर माहीतीवरून तसेच तांत्रीक तपास करून व सापळा रचुन आरोपी १) विशाल रामचंद्र मानेकर वय ३४ वर्ष हुडको कॉलोनी, जरीपटका २) चक्रधर मधुकर चौधरी, वय ४५ वर्ष, जरीपटका यांना ताब्यात घेवुन विचारपूस केली असता आरोपीनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींना नमुद गुन्हयात अटक करून त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हयात चोरी केलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख २५,७५०/- रू तसेच गुन्हयात वापरलेली पल्सर २२० मोटरसायकल के एम.एच ३४ बी.एम १४३० असा एकूण २,६२,६१०/- रु चा मुद्देमाल काढून दिल्याने त्याचे ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाई करीता पोलीस ठाणे जरीपटका येथे ताब्यात देण्यात आले.
नमुद कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पोलीस उप-आयुक्त (डिटेक्शन), यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि मयुर चौधरी, पोहवा राजेश देशमुख नापोअ रवि अहीर, प्रशात गमने श्रीकांत उईके, प्रविण रोडे, पोअ. कुणाल मसराम, निलेश श्रीपात्रे, सुधिर पवार यांनी केली.