ॲट्रासिटीबाबत कार्यशाळा लवकरच जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती बैठक

नागपूर :- अत्याचार प्रतिबंधक कायद्याची माहिती होण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी लवकरच कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी सांगितले.

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात घेण्यात आली. या बैठकीला सरकारी अभियोक्ता, पोलीस अधिकारी व समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत 30 नोव्हेंबरपर्यंत घडलेल्या गुन्ह्याची माहिती सादर करण्यात आली. एकूण 2 हजार 177 गुन्हे घडले असून त्यात शहरी 715 तर ग्रामीण 1 हजार 462 गुन्ह्यांचा समावेश आहे. 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर या कालावधीत एकूण 78 गुन्हे घडले असून शहर 35 व ग्रामीण 43 गुन्ह्याचा समावेश आहे. यात अनुसूचित जातीचे 63 व अनुसूचित जमातीचे 15 गुन्हे आहेत. 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबरअखेर 1 कोटी 4 लाख 50 हजाराचे अर्थसहाय्य प्रलंबित प्रकरणासाठी मंजूर असल्याचे सांगण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Winter Carnival at Nagpur Waldorf Inspired School

Thu Dec 28 , 2023
Nagpur :-To bring in the season of Yuletide in the Waldorf way, the Nagpur Waldorf Inspired School (NWIS) held a Winter Carnival at the School on Ring Road, Near Katol Road on 23rd December, 2023 from 4 pm to 7 pm. Students and Parents of NWIS and many other visitors from the city enjoyed at the various stalls and tried […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com