संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कोणीही नसल्याने जिवहानी टळली, आगीचे नेमके कारण गुलदस्यात.
कन्हान : – जुन्या पोलीस स्टेशन ला लागुनच जप्त असलेल्या वाहना ला रविवार (दि.५) मे अचानक आग लागली. या घटनेत एकुण २५ दुचाकी वाहने आगीत जळाले. कोणीही नसल्याने सुदैवाने कुणालाचा ईजा व जिवहानी झाली नाही. परंतु या आगीच्या घटनेमुळे अनेक उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
सुत्रान कडुन प्राप्त माहितीनुसार कन्हान पोलीस स्टेशन ला लागुन असलेल्या विविध गुन्ह्यात जप्त केले ली वाहने मुद्देमाल म्हणुन अनेक दिवसा पासुन जमा आहे. यात दुचाकी, चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात आहेत. रविवार (दि.५) मे ला दुपारी १२.३० अचानक या भंगार वाहनाच्या गर्दीतुन धुर निघायला लागला आणि अल्पअधित इथल्या वाहनांनी पेट घेतला. पाह ता पाहता एकुण २५ वाहनांचे आगीत जळुन नुकसान झाले.
स्थानिक लोकांनी तत्परता दाखवत घटनेची माहिती कन्हान पोलीसांना आणि कन्हान-पिपरी नगर परिषद अग्निशमन विभागाला दिल्याने अग्निशमन पथकाची वाहन तात्काळ घटनास्थळी पोहचुन आगी वर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु वाहना ला आग कशी लागली हे अजुन ही गुलदस्यात आहे. कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.