महिला लोकशाही दिन 15 जुलै रोजी

यवतमाळ :- महिलांच्या तक्रार निवारणासाठी सोमवारी दि.15 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला लोकशाही दिनी जिल्ह्यातील तक्रारग्रस्त महिलांनी तक्रारी मांडव्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. महिलांनी प्रथम या लोकशाही दिनात तक्रार दाखल करावी. सदर तक्रारीवर योग्य कारवाई झाली नसल्यास जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात तक्रार सादर करावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी आणि वैयक्तिक तक्रार किंवा निवेदने स्विकारले जाणार नाहीत, याची महिलांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ५० रुपये प्रति दिवस विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती

Fri Jul 12 , 2024
मुंबई :- परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या १५ वर्षांच्या आतील सर्व परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिवस ५० रुपये विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. सर्व वाहनधारकांनी याची नोंद घेत आपापली वाहने योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com