घरफोडी करणाऱ्या आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल

नागपूर :- दिनांक २३.०५.२०२३ वे ०७.०० वा ते दि. २९.०५.२०२३ ०७.३० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे सदर हद्दीत नं. ०४ बिल्डींग नं.२०, आकार बिल्डर, गोंडवाना चौक, बैरामजी टाऊन, नागपुर येथे राहणारे फिर्यादी रफिक रमजान अंसारी, वय ४८ वर्ष, हे घराला कुलूप लावून परीवारासह केरळ, अहमदाबाद येथे फिरण्या करीता गेले होते ते घरी नसताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराच्या मागील दाराचे लॉक कडी-कोंडा तोडुन घरात प्रवेश करून बेडरूम व हॉलमधील सोन्याचे नाणे ०१ नग, मनगटी घड्याळ ०३ नग, सोनी कंपनीचा एल. सी. डी. टीव्ही, डेल कंपनीचा लॅपटॉप, पार्कींग मध्ये ठेवलेली ज्यास कंपनीची कार क्र. एम. एच. ४० के. आर. २००५ व रोख ५,५००/- रु. असा एकूण किंमती अं. ३,७९,५००/- रू चा मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो.ठाणे सदर येथे पोउपनि खांडेकर यांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४५४, ४५७, ३७९, ३८० भादवि अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शासनाच्या लोकाभिमुख योजनांचा लाभ घ्यावा - सरपंच लक्ष्मण करारे

Wed May 31 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कढोली गावात दोन दिवसीय ‘शासन आपल्या दारी’शिबिर संपन्न कामठी :- सर्व सामान्य गोरगरीब,शेतकरी ,शेतमजुरांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासकीय स्तरावरून विविध उपक्रम राबविले जातात.या माध्यमातून शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यात येतो तसेच शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’या अभियानातून लोकाभिमुख योजनेचा लाभ देण्यात येत आहे तेव्हा शासनाच्या लोकाभिमुख योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कढोली ग्रामपंचायत चे सरपंच लक्ष्मण करारे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com