नागपूर :-दिनांक ०७.०२.२०२४ चे 2 वा. ते 4 वा. दरम्यान पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस भवनाचे प्रांगणात नागपूर शहरातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, संघठीत टोळीचे सदस्य, घरफोडी, चोरी करणारे तसेच शरीराविरूध्द गुन्हे करणारे, वारंवार गुन्हे करणारे आरोपींना पडताळणी करीता पाचारन करण्यात आले होते, पोलीस आयुक्त नागपूर शहर रविन्द्र सिंघल यांनी गुन्हेगारांची सविस्तर माहिती घेतली गुन्हेगारांना त्यांची सद्य परिस्थीती त्यांचा काम धंदा, या बाबत विचारपूस केली. पोलीस आयुक्त यांनी गुन्हेगारांना मार्गदर्शन केले तसेच कायदा हातात न घेण्याची समज व सुचना देवुन कोणतेही बेकायदेशीर कृत्य केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्याची सक्त ताकीद दिली. मोठया संख्येने गुन्हेगार हजर होते.
ज्यामध्ये १) अश्विन लक्ष्मण रामासे रा. जरीपटका, नागपूर २) रविन्द्र माणिराव उईके रा. जरीपटका, नागपूर ३) राहुल अनिल खोब्रागडे रा. जरीपटका, नागपूर ४) अंकोश संजय फुके रा. बर्डी, नागपूर ५) अब्दुल करीम शेख रा. मानकापूर ६) राकेश गणेश हेडाऊ रा. तहसिल ७) सिताराम फुलचंद शाहु रा. शांतीनगर ८) सनी धिरज समुद्रे रा. लकडगंज ९) सनी सुरेन्द्र चव्हाण रा. ईमामवाडा १०) मयुर सुरेश फुले रा. ईमामवाडा ११) रोहीत नंदनवार रा. पारडी १२) सौरभ गजानन कडु रा. प्रतापनगर १३) ऋषी नरेश कुट्टेवार रा. सोमवारी क्वार्टर, सक्करदरा १४) जाकरी खान नाजीर खान रा. सक्करदरा १५) अनिकेत दिलीपराव काळे रा. सक्करदा १६) मुकेश रोहन काटोले १७) दानीश वसीम खान १८) हर्षल उर्फ पिंडा सदानंद आनंद पवार १९) मुक्केश उर्फ कैची महादेव हेडाऊ २०) सौरभ सुधिर वासनिक रा. पाचपावली व इतर आरोपी हजर होते.