मान्सूनपूर्वी नाग नदीचे स्वच्छता आणि रुंदीकरण कार्य पूर्ण करा – मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांचे निर्देश

नागपूर :- नागपूर शहरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदीच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. या अभियानामध्ये नाग नदीच्या अंबाझरी दहन घाट परिसरातील पात्राचे रुंदीकरण देखील केले जात आहे. नाग नदी स्वच्छता तसेच पात्राचे रुंदीकरण कार्य मान्सूनपूर्वी पूर्ण व्हावे यादृष्टी गती वाढविण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

डॉ. चौधरी यांनी नाग नदी स्वच्छता तसेच अंबाझरी दहन घाटाजवळील पात्राच्या रुंदीकरण कामाची पाहणी केली व आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात मुख्य अभियंता राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, कार्यकारी अभियंता विजय गुरूबक्षाणी आदी उपस्थित होते.

नाग नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होउ नये व खूप जास्त पावसातही पाणी सुरळीत वाहून जावे यासाठी अंबाझरी दहन घाट ते व्हीएनआयटी पूलापर्यंतचे पात्र रुंद करण्याची सूचना सिंचन विभागाद्वारे करण्यात आली होती. या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विभागाद्वारे हे कार्य सुरू आहे. मनपा आयुक्तांनी अंबाझरी दहन घाट ते व्हीएनआयटी पुलापर्यंतचे पात्र तसेच एनआयटी स्केटिंग रिंक येथील पात्राची पाहणी करून या कामाबाबतची स्थिती जाणून घेतली. अंबाझरी लेआयउट येथील नदी पात्राची पाहणी करताना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी क्रेझी केसलद्वारे पात्रावर निर्माण केलेले लोखंडी पूल त्वरीत काढण्याबाबत निर्देशही दिले. याशिवाय त्यांनी अशोक चौक येथे भेट देउन येथील नाग नदीच्या पात्राच्या स्वच्छता कार्याचा आढावा घेतला.

पावसाळ्यात अतिरिक्त पाणी आल्यास पाण्याचा लगेच नाग नदीत निचरा व्हावा व नदीतील पाणी सुरळीत प्रवाहित व्हावे, त्याला कुठलाही अडथळा निर्माण होउ नये यादृष्टीने कटाकाक्षाने कार्य करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाला दिले होते. तांत्रिक आणि शास्त्रशुद्ध दृष्ट्या कार्य व्यवस्थित व्हावे याकरिता या कामाबाबत सिंचन विभागाद्वारे अभिप्राय आणि सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. सिंचन विभागाद्वारे नदीच्या उगमापासून पाण्याचा प्रवाह अधिक सुरळीत व्हावा याकरिता पात्राचे रूंदीकरण करण्याबाबत सूचना केली होती त्यानुसार मनपाद्वारे रुंदीकरणाचे कार्य प्रगतीपथावर आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आचार्यश्री पुलकसागरजी गुरुदेव के अवतरण दिवस पर हुआ णमोकार महामंडल विधान

Mon May 13 , 2024
नागपुर :- भारत गौरव राष्ट्रसंत आचार्यश्री पुलकसागरजी गुरुदेव के 54 वे अवतरण दिवस पर जारी पुलक पर्व के दूसरे दिन इतवारी शहीद चौक, भगवान पार्श्वनाथ मार्ग स्थित श्री पार्श्वप्रभु दिगंबर जैन सैतवाल मंदिर में गुरुपूजन, णमोकार विधान का आयोजन किया गया था। मुनिश्री आचरणसागर गुरुदेव ससंघ के सानिध्य में जिनेन्द्र भगवान की शांतिधारा, अभिषेक, गुरुपूजन, णमोकार महामंडल विधान संपन्न हुआ। […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com