वाहन चोरी चे ८५ गुन्हे उघडकीस एकुण १११ वाहने जप्त

– गुन्हेशाखा, वाहन चोरी विरोधी पथक, पोलीसांची कामगीरी 

नागपूर :- पो. ठाणे वाडी हद्दीत, रघुपती नगर, सतगुरूशरण सोसायटी, प्लॉट नं. २४, नागपुर येथे राहणारे फिर्यादी अनिल बाबाराव पखाले, वय ४८ वर्षे, यांनी त्यांची प्याशन प्रो क. एम. एच ४० ए.एफ ६२६५, किमती ५०,०००/- रू. ची पोलीस ठाणे वाडी हदीत राहुल हॉटेल समोर, पाॉकींगमध्ये लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पो. ठाणे वाडी येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हे शाखा वाहन चोरी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक तपास करून तसेच नागपूर शहरातील खाजगी व सरकारी कॅमेरेची पाहणी केली तसेच वाहन चोरीचे हॉटस्पॉट काढून सिसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपीचा मागोवा घेवुन व मिळालेल्या गोपनीय खात्रीशीर माहितीवरून कोंढाली येथे वर्णनावरून शोध घेवून सापळा रचुन आरोपी निष्पन्न करून आरोपी नामे ललीत गजेन्द्र भोगे वय २४ वर्ष रा. विकास नगर, कोंढाली जि. नागपुर यास ताब्यात घेवून त्यांची सखोल विचारपूस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली.

आरोपीचे ताब्यातुन त्याचे घराचे परीसरातुन वेगवेगळया गुन्हयातील चोरी केलेले २० वाहने जप्त करण्यात आली, तपासा दरम्यान आरोपीस अधिक सखोल विचारपुस करून त्याचे ताब्यातुन ९१ चोरीची वाहने जप्त करण्यात आली, आरोपीचे ताब्यातुन एकुण १११ चोरीची वाहने किमती अंदाजे ७७,७०,०००/- रू चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आरोपी कडून नागपूर शहरातील वाडी-११, बतौली-८, सिताबर्डी-३, एम.आय.डी.सी, नंदनवन प्रत्येकी २, कोराडी, ईमामवाडा प्रत्येकी १ असे एकुण २८ गुन्हे उघडकीस आणलेली आहे. नागपूर ग्रामीण येथील पोलीस ठाणे कळमेश्वर-६, उमरेड-५, सावनेर ३, वोरी-३, काटोल, पारशिवनी, खापरखेडा, भिवापूर येथील प्रत्येकी १ असे एकुण २१ गुन्हे उघडकीस आणलेले आहे. अमरावती शहर येथील ५ गुन्हे, अमरावती ग्रामीण ५ गुन्हे, चंद्रपूर-४ गुन्हे, यवतमाळ ८ गुन्हे, वर्धा-९ गुन्हे, भंडारा-३ गुन्हे, व अकोला, गडचिरोली येथील प्रत्येकी १ असे वाहन चारीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले.

वरील कामगिरी पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उपायुक्त (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली, पोउपनि, अनिल इंगोले, पोहवा, दिपक रोठे, नापोअं. विलास कोकाटे, अजय शुक्ला पंकज हेडाऊ पोर्ज, कपिल ताडकर राहुल कुसरामे, अभय ढोणे तसेच पोउपनि बलराम झाडोकर व सायबर सेलचे अंगलदार यांनी केली.

NewsToday24x7

Next Post

घातक शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींना अटक

Thu Feb 8 , 2024
नागपूर :- पाचपावली पोलीसांचे तपास पथक हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून गंगा बारसे नगर, कलकत्ता रेल्वे लाईन जवळ, सार्वजनीक ठिकाणी हातात शस्त्र घेवुन येणारे जाणारे लोकांना शिवीगाळ करणारे दोन इसमांचा पाठलाग करून ताब्यात घेतले, आरोपी क. १ हा हातात तलवार घेवुन समक्ष मिळाल्याने तलवार ताब्यात घेतली, त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता, त्यांनी आपले नाव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com