केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले सागर निवासस्थानी श्री गणरायाचे दर्शन

– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सहकुटुंब शाह दाम्पत्याचे स्वागत

मुंबई :-  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट देवून श्री गणरायाचे दर्शन घेतले.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाह यांचे श्रीगणेशमूर्ती, शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री सरिता फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, कन्या दिविजा फडणवीस,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार, माजी खासदार रावसाहेब दानवे हे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिवसेना एकनाथ शिंदे गट मोवाड तर्फे तान्हा पोळा साजरा

Mon Sep 9 , 2024
– उपजिल्हाप्रमुख पुरुषोत्तम धोटे यांची प्रमुख उपस्थिती नरखेड :- मोवाड शहरात शिवसेना पार्टी एकनाथ शिंदे गटातर्फे भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन दि. ५ सप्टेंबर गुरुवारला ५ वाजता आठवडी बाजार मोवाड येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पुरुषोत्तम धोटे विधानसभा संघटक काटोल, प्रितेश लोंढे तालुका प्रमुख ,अजय बालपांडे ,विशेष अतिथी मोवाड न.प. मुख्याधिकारी अमोल परिहार शिवसेना मोवाड शहर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com