नागपूर :- फिर्यादीचे वडील नामे वामनराव भनारकर वय ६४ वर्ष रा. लालगंज, झाडे चौक, बस्तरवाडी, शांतीनगर, नागपूर हे त्यांचे सायकलने लालगंज, झाडे चौकातून रोडने जात असतांना ई-रिक्षा गाडी क. एम.एच ४९ सि.एफ २२४९ चा चालक नामे हुसेन मुस्तफा रनालवाले वय ३४ वर्ग रा. प्लॉट नं. ३७०, पटवी मंदीर गल्ली, कांन्द्रीकर यांचे घरा मागे, गोळीबार चौक, तहसिल, नागपूर याने त्याचे ताब्यातील ई-रिक्षा दारूचे नशेत बेदरकार, भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन फिर्यादीचे वडीलांचे सायकलला मागुन धडक मारल्याने ते खाली पडुन गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकामी समर्पण हॉस्पीटल व तेथुन मेयो हॉस्पीटल येथे नेले असता, उपचारादरम्यान डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.
याप्रकरणी फिर्यादी सचिन वामनराव भनारकर वय ३४ वर्ष यांनी दिलेल्या सुचनेवरून पोलीस ठाणे शांतीनगर येथे सपोनि भांड यांनी आरोपी वाहन चालक विरुध्द कलम २७९, ३०४(२) भा.द.वि. सहकलम १८५ मो.वा.का अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास करीत आहे.