नागपुर – पो.स्टे. गिट्टीखदान हद्दीतुन हरविलेल्या मोबाइल बाबत दिलेल्या तक्रारीवरुन तंत्रज्ञानाचा वापर करुन गिट्टीखदान पोलीसांनी एकुण 12 मोबाईल किं.अं. रु. 2,40,000/- चे शोध घेवुन त्यांचे मुळ मालकाचे ताब्यात देण्यात आले आहे.
नागपूर शहराचे परिमंडळ क्र. 02 पोलीस उपायुक्त विनीता शाहु, सहायक पोलीस आयुक्त(सदर विभाग) माधुरी बावस्कर यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. गिट्टीखदान येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबु ढेरे व पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांचे हस्ते मुळ मोबाईल धारकांना त्यांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले. सदर कामगीरी पोउपनि राजकुमार उपाध्याय, ना.पो.शि कमलेश शाहु, अजय यादव, पो.अं. विक्रम ठाकुर यांनी केली