केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्र दौऱ्यासाठी नागपूरला आगमन

विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वागत

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह फुटाळा तलावाच्या ‘फाऊंटन शो ‘ चा आनंद घेतला

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नागपूर विमानतळावर महाराष्ट्राच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रात्री पावणेआठ वाजता आगमन झाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर फुटाळा तलाव येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले.

गृहमंत्री अमित शहा विशेष विमानाने गुवाहाटीवरून नागपूरला पोहोचले. पुढील तीन दिवस ते महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. आज रात्री त्यांचा नागपूर येथे मुक्काम असून उद्या सकाळी पवित्र दीक्षाभूमी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ते अभिवादन करणार आहेत. त्यानंतर रेशीम बागेतील स्मृती भवन येथे ते भेट देणार आहेत. त्यानंतर लोकमत वृत्तपत्राच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते सहभागी होणार आहेत.

आज विमानतळावर आगमन झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. कृपाल तुमाने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, विकास कुंभारे, मोहन मते, समीर मेघे, टेकचंद सावरकर,कृष्णा खोपडे, विभागीय आयुक्त विजयलक्षमी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, माजी खासदार विजय दर्डा, डॉ.विकास महात्मे,अजय संचेती, माजी आमदार परिणय फुके, अरविंद गजभिये, अर्चना डेहनकर, राजू पोतदार, मलिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

त्यानंतर त्यांनी फुटाळा तलावावरील जगप्रसिद्ध ‘लाईट  फाऊटन शो ‘चा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आनंद घेतला. त्यांच्यासाठी आज हा विशेष ट्रायल शो आयोजित करण्यात आला होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नवनियुक्त राज्यपालांचे राजभवन येथे स्वागत

Sat Feb 18 , 2023
मुंबई :- महाराष्ट्राचे नामनिर्देशित राज्यपाल रमेश बैस व रामबाई यांचे राजभवन मुंबई येथे आगमन झाले. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, सहसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर तसेच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.  रमेश बैस दिनांक १८ फेब्रुवारी रोजी राज्यपाल पदाची शपथ घेत आहेत.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.38.56_131274e2.mp4Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com