संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 4 :- आज रविवार मित्रांसह आनंदात घालविण्याच्या उद्देशाने कळमना येथून महिंद्रा पिकअप टेम्पोने मित्रांसह बिना संगम येथे जेवण करायला जात असता आशा हॉस्पिटल समोरील वारेगाव बाह्य वळण मार्गावर सदर पिकअप टेम्पो वाहन पलटल्यांने घडलेल्या गंभीर अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर चार जण गंभीर जख्मि झाल्याची घटना आज दुपारी 2 दरम्यान घडली असून मृतकाचे नाव संतोष रामसिंग डोकरे वय 24 वर्षे रा बेलेनगर कळमना नागपूर असे आहे.
तर चार जख्मि मध्ये पंकज जांगडे वय 40 वर्षे रा वाठोडा, प्रिंस भिवगडे वय 20 वर्षे रा दुर्गा नगर ,कळमना,गणेश गुगुस्कर वय 24 वर्षे रा दुर्गा नगर कलमना,संजय आग्रे वय 24 वर्षे लकडगंज नागपूर असून खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिंद्रा पिकअप टेम्पो चालक रोहित आग्रे हे महिंद्रा पिकअप क्र एम एच 49 डी 079 ने सदर मृतक व इतर चार जख्मि सह बिना संगम येथे वारेगाव बाह्य वळण मार्गे जात असता वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर वाहन पलटल्याने घडलेल्या गंभीर अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाला तर इतर चार जण गंभीर जख्मि झाले.या घटनेने जेवायला जाणे चांगलेच महागात पडले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले तर जख्मिना उपचारार्थ नजीकच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.