भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे कांग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर समोर एक मोठे आव्हान

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– कामठी तालुक्यात रंगताहेत निवडणुकीच्या गप्पा

कामठी :- येत्या 20 नोव्हेंबर ला होऊ घातलेल्या कामठी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 29 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत . या कामठी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडी च्या उमेद्वारात थेट लढत होणार असली तरी बसपा व वंचीत सह इतर पक्षांसह अपक्ष उमेदवार दम ठोकून आहेत.तरी या निवडणुकीत कांग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश भोयर यांच्या बाबतीत मतदारात आपुलकीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच एकदा सुरेश भोयर यांना संधी देण्याचे समर्थकांनी ठरवले असून जोरणीशी जोमात प्रचार सुरू आहे तर विकासपुरुष म्हणून ख्यातिप्राप्त चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विषयी सुद्धा मतदारात आपल्या हक्काचा माणूस असल्याचे वातावरण निर्मिती झाले असून काही समाजबांधवी संघटनांनी आपले खुले समर्थन दर्शविले आहे त्यातच आता मतदारांचा कौल कोणत्या उमेदवाराकडे जाईल हे मतदानातून कळणार असले तरी या विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची हेट्रिक करणारे भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे प्रतिस्पर्धी असलेले कांग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश भोयर यांच्यासाठी एक मोठे आव्हान ठरले आहेत.तर दुसरीकडे या निवडणुकीत आपला विजय पक्का असला तरी निवडणूक सहज न घेता अति आत्मविश्वास नडता कामा नये व विजयाची लीड मोठ्या संख्येत राहावी यासाठी उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचाराला गती देत जागोजागी भेटी देऊन मतदारांशी थेट संपर्क साधून केलेल्या विकासकामांची आठवण करून देत आहेत.

मागील 2019 च्या निवडणुकीत निसटता पराभव झालेले कांग्रेस महाविकास आघाडीचे माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यासह भाजप चे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे थेट जोरदार प्रदर्शनासह प्रचाराला जोम देऊन आहेत .तर या विधानसभा निवडणुकीत दोन्ही उमेदवार आपपल्या पक्षात कार्यकर्त्यांत एक मोलाचे व महत्वपूर्ण प्रभावित व्यक्तिमत्त्व असले तरी या निवडणुकीत मागील 2019 च्या निडणुकीत कांग्रेस चे उमेदवार सुरेश भोयर यांचा पराभव झाल्यानंतर माजी मंत्री सुनील केदार यांनी कामठी विधानसभा मतदार संघाला दत्तक घेऊन सुरेश भोयर यांना सोबतीला ठेवून पूर्ण पाच वर्ष नागरिकांच्या संपर्कात राहिले परिणामी सुरेश भोयर हे सत्तेवर नसले तरी पराभवाचा कुठलाही भाव त्यांना मनात आला नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या संपर्कात आले व पुनश्च उमेदवारी चा दावा ठोकला त्या दाव्याला माजी मंत्री सुनील केदार यांनी प्रतिष्ठा पणाला लावून तिकीट खेचून आणण्यात यश गाठले तर या निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध सुरेश भोयर अशी थेट लढत होत असली तरी वास्तविकता या निवडणुकीत उमेदवार सुरेश भोयर हे प्रत्यक्ष लढत असले तरी सुरेश भोयर यांच्या मागील चेहरा हा माजी मंत्री सुनील केदार यांचा राहणार आहे त्यामुळे ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध अप्रत्यक्ष सुनील केदार अशी लढत होताना दिसणार आहे.ही निवडणूक वर्चस्व व प्रतिष्ठेची होणार आहे असे असले तरी सोबतीला असलेले खासदार श्यामकुमार बर्वे यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य व महत्वपूर्ण भूमिका दिसून येत आहे त्यातच भाजप चे विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांची तिकीट कापुन,माजी जी प सदस्य अनिल निधान यांना आमदारकीचा उमेदवार देण्याचा शब्द देऊन न पाळता त्यांची निराशा करीत खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रिंगणात आले त्यामुळे निवडणूक प्रचारात टेकचंद सावरकर व अनिल निधानचा सहवास असला तरी धोका तर होणार नाही ना याही चर्चेला उधाण आहे त्यामुळे बावनकुळे सतर्कता बाळगून आहेत तसेच वंचीतचे उमेदवार प्रफुल मानके तर बसपाचे उमेदवार विक्रांत मेश्राम यांच्यासह इतर ही पक्ष व अपक्ष उमेदवार ब प्रचारात जोर लावले आहेत. कामठी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कामठी विधानसभा मतदार संघातील कामठी, मौदा व नागपूर ग्रामीण या तिन्ही तालुक्यातील गाव गल्लीत व शहरात चौका चौकात चहा टपरी वर विविध चर्चाना उधाण आले असून नागपूर ग्रामीण मतदार संघ तसेच कामठी शहर हे निवडणूक निकालासाठी निर्णायक ठरणार आहेत हे इथं विशेष!

मतदार संघातील समस्या किती सुटल्या, किती समस्या जैसे थे याचा सरासर विचार करून जो पक्ष अथवा उमेदवार मतदार संघाच्या विकासाला हातभार लावण्यास सक्षम आहे त्याच्याच पारड्यात मत टाकण्याचा विचार मतदार करीत आहेत.त्यामुळे स्वतःला मतदारांचे ठेकेदार समजणारे गावपुढारी धास्तावले आहेत. कामठी विधानसभा मतदार संघातील चावडी,हॉटेल, बस स्थानकावरील कॉर्नर तसेच चहा टपऱ्या आणि चौका चौकात त्याच प्रमाणे गाव गल्लीत निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत तर या निवडणुकीला आपले सुगीचे दिवस आले असे गृहीत धरणारे अति शहाणे पैसे कमविण्याची आपली व्युव्हरचना आखत आहेत .कोणता उमेदवार आपल्या मतदार संघाला न्याय देऊ शकेल ,राष्ट्रीय पातळीवर कुणाची सत्ता असायला हवी ,शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडविणार अशा अनेक मुद्द्यावर चर्चा रंगत आहेत.या चर्चांमधून मतदारांचा कौल दिसण्याऐवतच मतांचा निर्णयही लोक ठरवीत आहेत.आपल्याच पक्षाला मतदान कसे मिळेल याचे आराखडे बांधून गावपुढारी पक्षाकडे वजन वाढवत आहेत तर तसेच सर्वसामान्य जनतेला वेगवेगळी आमिषे दाखवून मतदान आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न जोमात सुरू झाला आहे .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निवडणुकीमुळे अनेकांना मिळाला रोजगार

Fri Nov 8 , 2024
  संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – वाहनचालकासह, प्रिंटिंग प्रेस ,ढाबेचालकाना आले सुगीचे दिवस कामठी :- मागील आठवडा भरापासून कामठी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अनेकांच्या हातात रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे.वाहनचालकासह प्रिंटिंग प्रेस,ढाबे चालकांना सुगीचे दिवस आले आहेत. एका उमेदवारांच्या प्रचारासाठी ऑटोरिक्षा,जिप,पिकअप, व छोटा हत्ती यासारख्या वाहनांना मागणी वाढली आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होणार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!