संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत संजीवनीनगर कांद्री येथे विष्णु खेरे यांच्या घरी कोणीतरी अज्ञात चोरट्यां नी घरफोडी करून घरातील एकुण नगदी बारा हजार रूपयाची चोरी करून पसार झाल्याने कन्हान पोली सांनी पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे.
प्राप्त माहिती नुसार विष्णु सुन्नर खेरे वय ४७ वर्ष राह. संजिवनी नगर कांद्री कन्हान यांची आई दुखाबाई खेरे ही किरनापुर ला राहत असुन आईचे ०३ नोव्हेंबर ला निधन झाल्याने विष्णु खेरे हे आपल्या कुटुंबासह खाजगी वाहनाने रात्री १० वाजता किरनापुर ला गेले होते. किरनापुर ला अंतिम संस्कार करून तेथे असता रविवार (दि.६) नोव्हेंबर ला सोनु थोरात या मुलीने फोन करून सांगितले की, ” तुमच्या घराचे कुलुप तुट लेले असुन तुमच्या घरी चोरी झाली असल्याचे सांगित ल्याने विष्णु खेरे हे आपल्या कुटुंबासह सर्व जण लगेच सकाळी घरी कांद्री ला परत आले आणि घरात जावु न पाहिले तर दरवाजाचे कडी कोंडा, कुलुप तोडलेले दिसले व घरातील सामान अस्तव्यस्त पसरलेले दिसले असुन घरातुन नगदी १२,००० रू चोरी केले. विष्णु खेरे हे आपल्या कुटुंबासह मुलगावी गेल्यावर अज्ञात चोरट्यांनी घरी कुणी नसल्याची संधी साधुन घराची घरफोडी करून घरातील एकुण नगदी १२,००० रूपये चोरी करून पसार झाल्याने फिर्यादी विष्णु खेरे यांच्या तक्रारीने कन्हान पोलीसांनी पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र. ६४१/२२ कलम ३८०, ४५७, ४५४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस स्टे शनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्श नात पो.ना प्रशांत रंगारी करित आरोपीचा शोध घेत आहे.