जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाची चर्चा बैठक संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 
कामठी ता प्र 26:- प्रा.अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे अध्यक्ष जि.काँ.क. ओबीसी विभाग ना.ग्रा, सत्तापक्ष नेता तथा सदस्य जि.प. नागपुर यांच्या नेतृत्वात जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग चर्चा बैठक विविध विषयांवर संपन्न झाली.
यामध्ये येत्या 28 तारखेला नागपूर मध्ये होणाऱ्या समर्पितआयोगाच्या बैठकीमध्ये निवेदन सादर करणे, 12 जुन 2022 ला पनवेल मुंबई येथे होणाऱ्या मंथन शिबीर विषयावर चर्चा करण्यात आली.,ओबीसी ची जात निहाय जनगणना व्हावी याकरिता जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग पुढील दोन महिन्यात आंदोलन करणार या विषयाच्या बाबी लक्षात घेता या चर्चासत्रात ओबीसींच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून याप्रसंगी प्रत्येक तालुक्यातील जिल्हा काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभागाचे पदाधिकारी शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!