चार पोलीस कर्मचारी निलंबीत

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 25:- ‘सद्रक्षणाय खलनिग्रहनाय हे ब्रीद बाळगून जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असणारे खाकी वर्दीतील पोलीस दुसऱ्यांना उपदेशाचे डोज पाजून कायद्याच्या भाषेत कर्तव्यदक्ष भूमिका बजावत असतात मात्र दुसऱ्यांना कायद्याच्या भाषेत उपदेशाचे डोज पाजणारे व नेहमी चर्चेच्या वादात अडकलेले नवीन कामठी पोलीस स्टेशनचे चार पोलीस कर्मचारी कर्तव्यावर दुर्लक्ष करून परस्पर कर्तव्य सोडून शासकीय निवासस्थानात तासपत्ते खेळताना व धूम्रपान करताना आढळून आल्याने डीसीपी श्रवण दत्त यांच्या आदेशानव्ये या चारही पोलिसांना निलंबित करण्याची कारवाही नुकतीच करण्यात आली असून निलंबित झालेल्या या चार पोलीस कर्मचाऱ्यात पोलीस शिपाई विलास पालांदुरकर,सुरेंद्र शेंडे, राजू लिखार, अनिकेत सांगळे सर्व नेमणूक नवीन कामठी पोलीस स्टेशन असे आहेत.

प्राप्त माहितीनुसार सदर निलंबित चारही पोलीस कर्मचारी 6 एप्रिल ला रात्रपाळी कर्तव्यावर रात्री 9 ते सकाळी 9 वाजेपर्यंत ड्युटी करीत असताना आपले कर्तव्य कायदेशिररित्या पार न पाडता कर्तव्यावर दुर्लक्ष करून बेजबाबदार व नैतिकअद्य पतनाचे वर्तन करून कर्तव्यात हलगर्जीपणा व निष्काळजी पणा दाखवीत नजीकच्या शासकीय निवासस्थानात धुम्रपान करून तासपत्ते खेळत असल्याचे निदर्शनास आल्याने डीसीपी श्रवण दत्त यांनी या चारही पोलीस शिपाई कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com