संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
27 पैकी 20 ग्रामपंचायतीच्या 52 आक्षेपावर झाली सुनावणी
कामठी :- आगामी होऊ घातलेल्या कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी 13 ऑक्टोबर 2022 ला प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यावर आक्षेपकर्त्याना 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची संधी देण्यात आली होती त्यानुसार एकूण 27 ग्रामपंचायती पैकी 20 ग्रामपंचायतीचे 52 आक्षेप नोंदविण्यात आले .या 52 आक्षेपांची तहसीलदार अक्षय पोयाम यांनी केलेल्या सुनावणीत 52 ही आक्षेप निकाली काढुन शक्य त्या आक्षेपावर चौकशीचे आदेश दिले असुन आज 21 ऑक्टोबर ला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
कामठी विधानसभा मतदार संघाच्या 31 मे 2022 रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या या निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानुसार 13 ऑक्टोबर ला प्रारूपच्या स्वरूपात मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या त्यावर 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्यात आल्या त्यावर काल 20 ऑक्टोबर झालेल्या सुनावणी नंतर प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या आज 21 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.