जीवानिशी ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊनही आरोपी अजूनही अटकेबाहेर..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 20 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कैन्टोन्मेंट परिसरातील बंगला क्रमांक 23 च्या वादातून बंगल्याचे भाडेकरू केबल व्यवसायिक सोनू पिल्लेवर प्राणघातक हल्ला करण्याची घटना 16 ऑक्टोबर 2020 रोजी घडली होती. यासंदर्भात जख्मि सोनू पिल्ले ने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते मात्र या प्रकरणात पोलिसांनी सदर प्रकरणात झालेल्या चिरीमिरीत गुन्हा दाखल करण्याचा प्रक्रियेला दुर्लक्षित करण्यात आले होते यासंदर्भात पोलिसांचा अभयपणा असलेले हे आरोपी बिनधास्तपणे मोकाट फिरत असल्याने न्यायिक भूमिकेतून पोलिसांकडून गुन्हा दाखल होत नसल्याचे निदर्शनास येताच पीडित फिर्यादी सोनू पिल्ले ने स्थानिक न्यायालयीन पायरी चढून 1 मार्च 2021 रोजी कामठी च्या न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला.यावर कामठी कोर्टाने 28 सप्टेंबर 2022 रोजी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देशित केल्या प्रमाने 19 ऑक्टोबर 2022 रोजी या गुन्हा प्रकरणातील आरोपी विरुद्ध जुनी कामठी पोलिसांनी भादवी कलम 307,143,147,34 अनव्ये गुन्हा दाखल केला.गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी मध्ये विकास विश्वनाथ गोयल,अमित विश्वनाथ गोयल,रा कपिल नगर, नागपूर व गौरव महेंद्र भुटानी रा माल रोड कामठी व इतर चार अनोळखी इसम रा कामठी चा समावेश आहे. एकीकडे गुन्हा दाखल करण्यात जुनी कामठी पोलिसांनी असमर्थता दर्शविल्याने पीडित फिर्यादी सोनू पिल्ले ला न्यायालयीन पायरी चढल्यानंतर तब्बल 2 वर्षाच्या कालावधीत न्यायालयीन आदेशानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यातच न्यायालयाने संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेशीत केल्यानंतरही आदेशाची लेटलतिफी करून 20 दिवसानंतर गुन्हा दाखल केला .त्यातही आरोपी अजूनही अटकेबाहेर आहे तर आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत यात पोलिसांचे आरोपीशी अर्थपूर्ण संबंध असल्याचे दिसून येत असल्याने आरोपींना पोलिसांचा अभयपणा आहे तेव्हा माझा खून झाल्यानंतर आरोपीना अटक करणार काय?असा प्रश्न उपस्थित करून माझ्या जीवितास पूर्णपणे धोका आहे तेव्हा माझ्या जीवितास कुठलाही धोका झाल्यास याला सर्वस्वी जवाबदार या प्रकरणातील गुन्हा दाखल असलेले आरोपी व स्थानिक जुनी कामठी पोलीस प्रशासन जवाबदार राहणार असल्याचे सोनू पिल्ले यांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार सदर पीडित फिर्यादी सोनू पिल्ले यांनी कन्टोन्मेंट परिसरातील बंगला क्र 23 हा दिल्ली चे पवणीतसिंग बेदी यांच्याकडून भाडेकरू म्हणून 2019 मध्ये संताजी वास्तव्यास होते ज्याचा करारनामा सुद्धा झालेला आहे .होळी चा पर्व असल्याने होळीचा सण साजरा करण्याहेतु बंगला ला टाळेबंद करून पुराणा गोदाम येथील जुन्या घरी गेले असता कुणीतरी सदर बंगल्याचा कुलूप तोडून घरात प्रवेश केल्याची माहिती दिली असता वेळीच धाव घेऊन पाहणी केली असता आरोपी विकास गोयल व त्याच्या सहयोगीनि घरातोल साहित्य बाहेर फेकले होते यावर झालेल्या भांडणावरून जुनी कामठी पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला होता तर याच भांडणाची पुनरावृत्ती 16 ऑक्टोबर 2020 ला झालेल्या भांडणात आरोपीने बेस बॉल, लोखंडी रॉड ने हल्ला करून सोनू पिल्ले ला बेशुद्ध होईपर्यंत मारले .कसाबसा जीव वाचवून आरोग्य उपचारादारम्यान बचावला मात्र या प्रकरणातील आरोपीना शिक्षा व्हावी यासाठी धडपड करीत आहे मात्र पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याने दाद मागावी कुणाकडे?असा प्रश्न उभा होऊन ठाकला आहे तर माझा जीव गेल्यानंतर मला न्याय मिळणार का?अशीही विचारणा सोनू पिल्ले करीत आहेत.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com