संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आ. देवेंद्र भुयार यांचा दिल्ली येथे ठिय्या ! 

– बांगलादेश आयात शुल्क वाढीबाबत केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची भेट ! 

– बांगलादेश निर्यात शुल्काबात बैठक आयोजित करण्याची मागणी ! 

मोर्शी :- बांगलादेश सरकारने संत्रा फळांवर वाढवलेले आयात शुल्क पुनर्संचयित करण्यासाठी बैठक आयोजित करण्याबाबत आमदार देवेंद्र भुयार यांनी थेट दिल्ली येथे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी भेट घेऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली.

विदर्भातील मुख्य फळ म्हणजे १.२६ लाख हेक्टरमध्ये संत्रा लागवड केली जाते, आंबिया आणि मृग बहार हंगामात सुमारे १ लाख शेतकरी दरवर्षी ८ ते १० लाख मेट्रिक टन उत्पादन घेतात. ही देशी उत्पादित संत्री दरवर्षी बांगलादेशात निर्यात केली जात असून बांगलादेश संत्र्याचा प्रमुख आयातदार आहे आणि आपला भारत दरवर्षी 1.5 ते 2.0 मेट्रिक टन संत्रा निर्यात करतो, ज्यामुळे संत्र्याचा बाजार दर स्थिर ठेवण्यास मदत होते. परंतु गेल्या 5 वर्षापासून बांगलादेश सरकारने 20 मध्ये 33 टक्के, 21-21-22 मध्ये 44 टक्के, 22-23 मध्ये 63 टक्के , 23-24 मध्ये 88 टक्के आणि 24-25 मध्ये 101 टक्के (सध्या) आयात शुल्क वाढवले आहे. या 5 पट शुल्क वाढीमुळे गेल्या काही वर्षात संत्र्याची निर्यात पूर्णपणे कोलमडली आहे आणि संत्र्याची किंमत 15 ते 20 रुपये प्रतिकिलोपर्यंत घसरली आहे, जे संत्रा उत्पादकांसाठी तोटा आहे आणि संत्र्याची त्रासदायक विक्री करत आहे या संदर्भात आमदार देवेंद्र भुयार यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन केंद्रीय पणन मंत्री पियुष गोयल यांची दिल्ली येथे भेट घेतली तेव्हा अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

त्यावेळी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी बांगलादेश सरकार सोबत तातडीने बैठक बोलवू असे आश्वासन दिले. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या निर्यातीचा प्रश्न घेऊन आमदार देवेंद्र भुयार, राज्यसभा सदस् प्रफुल पटेल यांनी महत्वाची भूमिका घेतली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य बाळू कोहळे, श्रमजीवी संत्रा उत्पादक संघाचे रमेश जिचकार. ताज फ्रुट कंपनीचे ताज खान मदने खान. संत्रा उद्योजक सोनू खान शेठ आदी शेतकरी व संत्रा निर्यातदार उपस्थित होते.

नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार असलेल्या बांगलादेशने आयात शुल्कात वाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विदर्भातील संत्र्याला बांगलादेश सरकारचा जोरदार झटका बसला असून बांग्लादेशने संत्र्याच्या आयातीवरील आयात शुल्क वाढवल्याने विदर्भातील संत्र्यांचे भाव गडगडनार आहेत. त्यामुळे संत्रा निर्यात प्रभावित होईल, अशी भीती व्यक्त करीत या प्रकरणी केंद्र सरकारने तत्काळ तोडगा काढावा अशी मागणी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, केंद्रीय वाणिज्य व पणन मंत्री पियुष गोयल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी मंत्री यांच्याकडे केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पात्र लाभार्थ्यांना मिळणार हक्काचे घर

Fri Jul 26 , 2024
“सर्वांसाठी घरे -2024”ही शासनाचे धोरण असून, तसेच राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थांना स्वत:चे हक्काचे घर मिळावे म्हणून असा शासनाचा प्रयत्न आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण व शहरी भागातील बेघरांना घरकूल उपलबध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकूल योजना राबविण्यात येत आहेत. आवास योजना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com