संदीप कांबळे, कामठी
-अटक सात आरोपीसह 1 लक्ष 75 हजार 30प रुपयांचा मुद्देमाल जप्त
कामठी ता प्र 8:-स्थानिक जुनो कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या विविध परिसरात अवैध धंद्याचे साम्राज्य पसरले असून त्यातील दुर्गा चौकात ही अवैध धंद्याचे साम्राज्य पसरले आहे ते फक्त येथील पी आय शिरे यांच्या आशीर्वादामुळे.तेव्हा येथील पी आय च्या आशीर्वादाने सुरू असलेल्या दुर्गा चौकातील अनधिकृत ऑनलाईन लॉटरी व्यवसायावर येथील दबंग अधिकारी पीएसआय केरबा उर्फ आकाश माकने यांनी आज सायंकाळी पाच दरम्यान दुर्गा चौकातील सदर अवैध लॉटरी व्यवसायावर धाड घालीत दुकानातील साहित्यासह नगदी 6 हजार 110 रुपये असा एकूण 1 लक्ष 75 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यातील अटक आरोपीमध्ये प्रदीप साखरकर वय 31 वर्षे रा बजरंग पार्क कामठी,राजू दुर्गे वय 32 वर्षे रा रामगढ कामठी,लक्ष्मीनारायण उर्फ राज पांडे वय 24 वर्षे रा फुटाना ओली कामठी,सचिन शेंडे वय 40 वर्षे रा रमानगर कामठी,परसराम वामनराव लोंबासे वय 55 वर्षे रा बजरंग पार्क कामठी,सिद्धार्थ मेश्राम वय 40 वर्षे रा कुंभारे कॉलोनी कामठी,बिसराम देवांगण वय 55 वर्षे रा हनुमान मंदिर ,छत्रपती नगर कामठी असे आहे.