केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रसारमाध्यमे सन्मान 2024 साठी प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2024 पर्यंत वाढवली

नवी दिल्ली :- आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 विषयी जागरूकता निर्माण करण्यात प्रसार माध्यमांनी निभावलेली सकारात्मक भूमिका आणि जबाबदारी यांची नोंद घेत आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तिसऱ्या वर्षीच्या म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रसारमाध्यमे सन्मान (एवायडीएमएस)2024 साठी प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत, सोमवार, 15 जुलै 2024 पर्यंत वाढवली.

आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रसारमाध्यमे सन्मान 2024 करिता यंदाच्या तिसऱ्या वर्षीच्या सन्मानांसाठी प्रसारमाध्यम कंपन्या त्यांच्या प्रवेशिका आणि माहिती येत्या 15 जुलै 2024 पर्यंत aydms2024.mib[at]gmail[dot]com या ईमेलआयडीवर पाठवू शकतात. या सन्मानसंबंधी उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवश्यक तपशीलवार मार्गदर्शक सूचना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या https://mib.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच पत्रसूचना कार्यालयाच्या https://pib.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, इंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

Wed Jul 10 , 2024
नागपूर :- दिनांक ०९.०६.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०४ केसेस तसेच, एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ०१ कैस असे एकुण ०५ केसेसमध्ये ०६ ईसमावर कारवाई करून रू. १,७०,९२५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ०१ केसमध्ये ०३ ईसमावर कारवाई करून रू. २,२१०/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com