अवैध दारू विक्रेता आरोपींविरूध्द कारवाई करून एकूण १,४१,०००/- रु चा मुद्देमाल जप्त

नागपूर :- पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत पोळा व भारत सना निमल ड्राय डे असल्याने अवैध दारू विक्री करणारे आरोपांविरुध्द कारवाई करीता यशोधरानगर पोलीसांनी वेगवेगळे पथक तयार करून त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून हद्दीमध्ये आरोपी १) सरोज आनंद बोरकर वय ५२ वर्ष २) राहुल मधुकर साखरे वय ३८ वर्ष दोन्ही रा. बहुजन हितकारणी बौध्द विहारा जवळ यशोधरानगर ३) गोविंदा रघुनाथ निखारे वय ४० वर्ष रा. बिनाकी मंगळवारी तलाव जवळ ४) ममता किशोर बघेले वय ५३ वर्ष रा धम्मानंद नगर ५) भागवत रामा राउत वय ५८ वर्ष रा. भिमवाडी पिवळी नदी ६) नितेश सुभाष झाडे वय २७ वर्ष रा. प्रवेश नगर यशोधरानगर यांचे ठिकाणी रेड कारवाई करून त्यांचे जवळुन देशी-विदेशी व मोहा फुलाची गावठी दारू असा एकूण १,४२,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूद्ध वेगवेगळे सहा दारू बंदी कायदानुसार गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली.

वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त परि क ५. सपोआ जरीपटका विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोनि ज्ञानेश्वर भेदोडकर, सपोनि विलास मोटे, योगेश महाजन, पोउपनि सचिन भालेराव, वाकडे, पोहवा श्याम कडु, नापोअ अमोल आप्तुरकर, पौअ, रोहित रामटेके, नारायण कोहचाडे, अमीत ठाकुर, रोशन जयस्वाल, मयूर गवई, सागर जयस्वाल यांनी केली.

NewsToday24x7

Next Post

फसवणुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Sat Sep 16 , 2023
नागपूर :-अनिरुद्ध लक्ष्मीनारायण शर्मा वय ३३ वर्ष रा. प्लॉट नं. ७२ अव्दैतम लेडी पार्क रामदापेठ, सिताबर्डी, नागपूर यांचे युगधर्म कॉम्प्लेक्स पाचवा माळा, सेंट्रल बाजार रोड, सिताबर्डी येथे पवनसुत ट्रॅव्हल्स प्रायवेट एजन्सी नावाने ऑफीस असुन त्या ठिकाणी सर्व एअर लाईन्सचे टिकीट काढले जातात तसेच अंतरराष्ट्रीय टूरचे आयोजन केले जाते. कोणीतरी अज्ञात आरोपीने फिर्यादीचे ट्रॅव्हल्स एजन्सीचे इंडिगो एअर लाईन्सचे लॉगीन आयडी व […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com