खापरखेडा :- मागील काही दिवसापासुन खापरखेडा पोलीसांनी सतर्कतेमुळे पो.स्टे. खापरखेडा परिसरातुन ८ माउद्वार जप्त करण्यात आलेले आहे. काही दिवसाअगोदर खापरखेडा वार्ड क. ०१ चिचोली खापरखेडा येथे राहणारा अभिषेक अंहिसक पाटील याने किरकोळ भांडणात लोकांना भिती दाखविण्याचे उददेशाने एक देशी माउझर काढुन हवेत लहरविली होती. पोलीस स्टेशन खापरखेडा येथील डी बी पथकाला यांची चाहुल लागताच ठाणेदार धनाजी जळक यांनी सदरची माहीती पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार व उपविभागिय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांना देऊन वरिष्ठांचे आदेश घेऊन दिनांक १६/०६/२०२४ रोजी ठाणेदार धनाजी जळक यांनी डी. वी पथकासह स्वतः हा जावुन अभिषेक अहिसंक पाटील याला ताब्यात घेऊन सखोल विचारपुस केली असता अभिषेक पाटील याने सांगितले की, सदर माउझर त्याने आपला मित्र विधी संघर्ष बालक याचे घरी लपवुन ठेवलेली आहे. खापरखेडा येथील ठाणेदार धनाजी जळक व डी बी पथक हे पंचासह अभिषेक पाटील याने दाखविलेल्या घरात जावुन अभिषेक पाटील याने अलमारीतुन काढुन दिली. एक देशी बनावटी माउझर (अग्नीशस्त्र) किमंती ३०,०००/- रू ची मौक्यावर जप्त केले व आरोपी अभिषेक यास अधिक विचारपुस केली असता त्याने सदर माउझर शुभम उर्फ शेरू उईके रा. वाई क. २ चिचोली खापरखेडा याचेकडुन खरेदी केल्याचे सांगितले. पोलीसांनी अभिषेक अहिसक पाटील रा. वाई क. १ चिचोली खापरखेडा कलम ३/२५, ५/२५ भारतीय हत्यार कायदा सहकलम १३५ मपोका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. फरार आरोपी शुभम उर्फ शेरू उईके व विधी संघर्ष बालक यांचा शोध सुरू आहे.
सदर कार्यवाही पोलीस हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ उपविभागिय पोलीस अधिक्षक संतोष गायकवाड सा. यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार धनाजी जळक सा., डी. बी. पथक येथील प्रफुल राठोड, शैलेश यादव, मुकेश वाघाडे, कविता गोंडाने, मुकेश वाघाडे, राजु भोयर, राजकुमार सातुर यांचे पथकाने पार पाडली आहे.