जंबुदीप नाल्याची आयुक्तांनी केली पाहणी

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी (ता. २४) सकाळी अयोध्या नगर येथील जंबुदीप नाल्याची पाहणी केली. सच्चिदानंद नगर आणि लाडीकर लेआऊट या भागातील जुबंदीप नाल्याच्या पात्राची त्यांनी पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. नाल्याचे काम सुरू असून उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी लोककर्म विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मोहन मते उपस्थित होते.

शनिवारी २० जुलै रोजी आलेल्या मुसळधार पावसामुळे हनुमान नगर झोन अंतर्गत अयोध्या नगर येथील जंबुदीप नाल्यामध्ये पुर परिस्थिती निर्माण झाली होती. आयुक्तांनी या भागातील पाहणी करताना मनपा लोककर्म विभागाच्या अधिकाऱ्यांना शासनाकडून उर्वरित कामाकरिता निधीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. तसेच नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी नाल्याची स्वच्छता व खोलीकरण लवकर करणे आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी आऊटलेटची क्षमता वाढविण्याचे देखील आदेश दिले.

याप्रसंगी अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहायक आयुक्त नरेंद्र बावनकर, उपअभियंता प्रवीण आगरकर, कनिष्ठ अभियंता उमेश मदने आणि स्वच्छता निरीक्षक दिनेश कलोडे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘पौर्णिमा दिवस” निमित्त नरेंद्र नगर परिसरात जनजागृती

Thu Jul 25 , 2024
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माजी महापौर व माजी आमदार प्रा.अनिल सोले यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या पौर्णिमा दिवस अभियानांतर्गत मंगळवारी (ता.२३) नरेंद्र नगर चौक परिसरात जनजागृती करण्यात आली. या अभियानाला नरेंद्र नगर चौक परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. जनजागृती दरम्यान स्वयंसेवकांनी दुकानदार तसेच नागरिकांना एक तास विद्युत दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले व नागरिकांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com