गाडेघाट फार्म हाऊसवर जुगार खेळणारे व प्रवृत्त करणा-या विरुद्ध पोलीसांची कार्यवाही

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- पोलीसानी गाडेघाट शिवारातील अम्मा दर्गाह चे मागे असलेल्या ” कामडे फॉर्म हाऊस” येथे आठ जुवारी ५२ तास पत्त्यावर पैश्याचा हार जीतचा जुगार खेळताना पकडुन त्यांचे ताब्यातील नऊ मोबाईल, १ तीनचाकी, ४ दुचाकी व नगदी ११९६० रू. असा एकुण ४,५०,९६० रु चा मुद्देमाल जप्त करुन त्यांचे विरोधात पोलीस स्टेशन कन्हान ला गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली.

मंगळवार (दि.१९) व बुधवार (दि.२०) सप्टेंबर २०२३ चे रात्री गाडेघाट, जुनीकामठी ता. पारशिवनी शिवारातील अम्मा दर्गाह चे मागे असलेल्या ” कामडे फॉर्म हाऊस” येथे काही जुवारी ५२ तास पत्त्यावर पैश्याची बाजी लावुन हार जीत चा जुगार खेळत आहे. अशी माहीती प्राप्त होताच वरिष्ठाचे मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते व सोबत पोलीस स्टाफ सपोनि चेतनसिंह चौहाण, सपोनि पराग फुलझे ले, पोहवा मुदस्सर जमाल, पोना अमोल नागरे, पोना आतिश मानवटकर, पोना अनिल यादव, पोशि नविन पाटील, पोशि आकाश शिरसाट, पोशि अश्विन गजभि ये दोन पंचासह गाडेघाट अम्मा दर्ग्याचे मागे कामडे फॉर्म हाऊस ” येथे पोहचुन पटांगणात काही जुवारी लोक ५२ तासपत्यावर पैश्याची बाजी लावुन हारजीत चा जुगार खेळतांना दिसुन आल्याने घेराव करून धाड टाकुन एकुण ०८ जुवारी १) नवाब अब्दुल जफार अन्सारी वय ३१ वर्ष रा. कोळसा टाल कामठी, २) सैय्यद शानु सैय्यद इकबाल वय ३० वर्ष रा. भोई लाइ न कामठी, ३) मोहम्मद सलमान मोहम्मद अफजल वय २३ वर्ष रा. बी.बी कॉलोनी कामठी, ४) आदित्य रोशन मानवटकर वय १८ वर्ष रा. नविन येरखेडा काम ठी, ५) गुड्डु असलममुल्ला असगर शेख वय ३९ वर्ष रा.नयाबाजार कामठी, ६) मोहसिन खान शेख गफ्फार वय ३७ वर्ष रा. फुटाना ओली कामठी, ७) अली अहम द महमुद अहमद वय २५ वर्ष रा. लकडगंज कामठी, ८) शेख इरफान शेख मकसुद वय ३१ वर्ष रा. भाजीमं डी कामठी तसेच त्यांना कामडे फॉर्म हाऊस मध्ये जुगार खेळण्यास बोलावुन प्रवृत्त करणारा शांतीलाल तुकाराम पगारे वय ४६ वर्ष रा सराखा बोर्डा ह.मु काम डे फॉर्म हाऊस यास ताब्यात घेवुन त्यांचे कडुन ५२ तास पत्ते, रोख ११,९६० रु. ऐकमेकांना संपर्क करून एकत्र येवुन जुगार खेळण्यास वापरलेले एकुण ९ मोबाईल ६९,००० रु तसेच आपआपले वास्तव्यातुन फार्म हाऊस मध्ये पोहचण्यास वापरलेले एक तीन चाकी वाहन व ४ दुचाकी किं. ३,७०,००० रु. असा एकुण ४,५०,९६० रु चा मुद्देमाल जप्त करुन त्यांचे विरोधात पोलीस स्टेशन कन्हान ला गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक हर्ष.ए. पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधि कारी पुंडलिक भटकर यांचे मार्गदर्शनात व पोनि सार्थक नेहेते, सपोनि चेतनसिंह चौहाण, सपोनि पराग फुलझेले, पोहवा मुदस्सर जमाल, पोना अमोल नागरे, पोना अतिश मानवटकर, पोना अनिल यादव, पोशि नविन पाटील, पोशि आकाश शिरसाट, पोशि अश्विन गजभिये यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिक्षण व आरोग्यावर प्राधान्याने निधी खर्च करा - जिल्हाधिकारी

Wed Sep 20 , 2023
Ø नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची आढावा बैठक Ø सप्टेंबर महिन्या अखेरपर्यंत खर्चाचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना नागपूर :-  नागपूर जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये आरोग्य, शिक्षण, रस्ते या विषयांवर प्राधान्याने निधी वितरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज दिल्या. तसेच, या महिन्या अखेरपर्यंत खर्चाचे सर्व प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात डॉ. इटनकर यांनी जिल्ह्यातील नगरपरिषदा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com