मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमुळे प्राण वाचलेल्या ‘दुवा’ चा वाढदिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा

कोल्हापूर :- मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मागील वर्षी वेळेत अर्थसहाय्य झाल्यामुळे प्राण वाचलेल्या “दुवा” या चिमुकलीचा महिलादिनी पहिला वाढदिवस हातकणंगले येथे झालेल्या ‘शिवराज्य भवन’ कोनशिला अनावरण कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून करण्यात आला.

यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा वैद्यकीय समन्वयक प्रशांत साळुंखे, साई स्पर्श हॉस्पिटलचे डॉक्टर विजय गावडे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून वेळेत अर्थसहाय्य मिळाल्यामुळे प्राण वाचलेल्या चिमुकलीच्या आईने कोल्हापूर मध्ये 13 जून 2023 मध्ये तपोवन मैदान येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आभाराचे पत्र दिले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ऋण व्यक्त करण्याच्या भावनेने त्यांनी मुलीचे नाव ‘ दुवा ‘ असे ठेवल्याचे तिची आई फरिन मकुबाई यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले होते.

आज याच “दुवा” चा पहिला वाढदिवस मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाल्यामुळे खूप आनंद झाल्याची भावना तिची आई फरिन मकुबाई यांनी व्यक्त केल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डेन्मार्क संसदेच्या तीन उपाध्यक्ष्यांनी घेतली राज्यपालांची भेट 

Sat Mar 9 , 2024
मुंबई :- डेन्मार्क संसदेचे तीन उपाध्यक्ष लिफ लान जेन्सेन, जेप्पे सो व करीना ऍड्सबोल यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची आज राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. भारत – डेन्मार्क राजनैयिक संबंध स्थापनेस ७५ वर्षे पूर्ण झाली असून उभय देशांमध्ये संसदीय सहकार्य, व्यापार, हरित ऊर्जा, शिक्षण व सांस्कृतिक संबंध वाढविण्याच्या उद्देशाने भेटीचे आयोजन केले असल्याचे उपाध्यक्ष लिफ लान जेन्सेन यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com