उमरेड :- फिर्यादी नामे पोउपनि प्रशांत सुदाम खोब्रागडे, वय ३२ वर्ष पो.स्टे. उमरेड यांच्या रिपोर्ट वरून पो.. स्टे. उमरेड येथे ९६/१९ कलम ३५३, ३३३, ३०७, ३४ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. फिर्यादा हे पोलीस स्टेशन उमरेड येथे पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असून यातील फिर्यादी हे रात्र गस्त करीत असतांना ट्रक MH-31 CQ 1121 चा चालक आरोपी नामे- महेश शिवदर उईके, वय ३२ वर्ष रा. मारई ता. परासिया जि. छिंदवाडा (एमपी) ह. मु. अमित मानुसमोर खरबी नागपूर +३ आरोपी यांना थांबण्याचा ईशारा केला असता ट्रक चालक गाडी न थांबवता निघुन गेला. जखमीने टूकचा पाठलाग करून ट्रक थांबवुन विचारपुस करण्याकरीता ट्रकच्या पायदानवर चढला असता ट्रक चालक ने ट्रक चालू करून ट्रक एक कि.मी. भरधाव वेगाने चालवून जखमीला ढकलुन जिवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकरणाचे तपास पोनि सुधाकर गोरे पो स्टे उमरेड यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. कोर्टामध्ये सादर केले. आज दिनांक ०९/०५/२०२३ रोजी मा. कोर्ट विद्यमान न्यायाधीश डी.जे ०५ अली सा. यांनी वरील नमुद आरोपी क्र. १ व २ यांना कलम ३५३ भादवि मध्ये ६ महिने सश्रम कारावास व प्रत्येकी ५०००/- रु. दंड, दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास तसेच कलम ३३३ भादवि मध्ये १ वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी ५०००/- रु. दंड दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास व इतर दोन आरोपी निर्दोष रिहा आहे.
सरकारचे वतीने एपीपी गौरकर यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अधिकारी म्हणून पोना / ४८७ माधवराव काळे पो.स्टे. उमरेड यांनी मदत केली आहे.