बेंच प्रेस पॉवरलिफ्टिंग स्पर्धेला सुरूवात : खासदार क्रीडा महोत्सव

नागपूर :- खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे मंगळवारी (ता.२३) पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते गरोबा मैदान येथे उद्घाटन झाले. याप्रसंगी स्पर्धेचे समन्वयक माजी नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, कन्वेनर सचिन माथने, माजी नगरसेवक प्रदीप पोहाणे, दीपक वाडीभस्मे, माजी नगरसेविका मनीषा धावडे, चेतना टांक, कांता रारोकर, क्रीडा शिक्षक अविनाश सहारे, बेंच प्रेस पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचे आनंद डाबरे, लक्ष्मीकांत मेश्राम आदी उपस्थित होते.

स्पर्धेत खुल्या गटातील मास्टर्स स्पर्धेत यूजीन स्मिथने स्पर्धेत विजयी सुरूवात केली. या गटात राजू दोडके दुस-या तर राजेश गौर तिस-या स्थानी राहिले. महिलांच्या 52 किलो वजनगटामध्ये रोहिनी मेश्रामने विजयासह स्पर्धेची सुरूवात केली. सलोनी कंटाळे आणि श्रावणी गर्जे ने दुसरे आणि तिसरे स्थान प्राप्त केले. 63 किलो वजनगटात अल्फीया शेखने प्रथम स्थान प्राप्त केले. सोनू सरोटे दुस-या तर चंदा ओझा तिस-या स्थानी राहिली. 63 किलोवरील गटात तन्वी रहाटेने पहिले, शुभांगी सुर्यवंशीने दुसरे आणि अर्चना नाडरने तिसरे स्थान प्राप्त केले.

NewsToday24x7

Next Post

शहरातील प्रभाग निहाय “सखोल स्वच्छता मोहिमस” प्रारंभ

Wed Jan 24 , 2024
नागपूर :- स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूरच्या दिशेने पाऊल टाकत नागपूर महानगरपालिकेद्वारा शहरातील प्रभागनिहाय “सखोल स्वच्छता मोहिम”ला सुरुवात करण्यात आली आहे. राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मागर्दर्शनात “सखोल स्वच्छता मोहिम” राबविण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे घेतलेल्या बैठकीत राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com