नागपूर :-फिर्यादी राजेंद्र बाबुलाल बागडीया, वय ३४ वर्षे, रा. करवर, अरीयाली, जि. गुंडी (राज्यस्थान), ह.मु.- दिघोरी टोल नाक्याजवळ, रोडच्या कडेला फुटपाथवर, नागपुर यांचा मातीचे भांडे व खेळणे विक्रीचा व्यवसाय असुन ते मागील ८ महीन्यापासुन त्यांचे परीवार व नातेवाईकांसह नागपुर मध्ये राहतात दिनांक १६.०६.२०२४ ये २३.०० वा. चे सुमारास, फिर्यादी व त्यांचे परीवारातील सदस्य १) कांतीबाई गजोड बागडीया, वय ४२ वर्षे २) सिताराम बाबुलाल बागडीया, वय ३० वर्षे ३) कविता सिताराम बागडीया, वय २८ वर्षे ४) बुलकु सिताराम बागडीया, वय ८ वर्षे, ५) हसिना सिताराम बागडीया, वय ३ वर्षे ६) सकिना सिताराम बागडीया, वय दिड वर्षे, ७) हनुमान खजोड बागडीया, वय ३५ वर्षे ८) विकम उर्फ भुशा हनुमान बागडीया, वय १० वर्षे ९) पानबाई मानसिंग बावरीया, वय १५ वर्षे हे सर्वजण जेवन करून रोडचा कडेला झोपले असता, एका सिल्व्हर रंगाचे हयुदाई वरणा कार क. एम.एच. ४६ एक्स. ८४९८ चे चालकाने दिघोरी उड्डाणपुलाकडुन उमरेड कडे जात असता, त्याचे ताब्यातील वाहन बेदरकारपणे, भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीचे झोपलेल्या नातेवाईकांचे अंगावरून चालवित नेवून सर्वांना गंभीर जखमी केले. सर्व गंभीर जखमी यांना मेडीकल ट्रॉमा सेंटर येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान नातेवाईक १) कांतीबाई गजोड बागडीया, वय ४२ वर्षे २) सिताराम बाबुलाल बागडीया, वय ३० वर्षे यांना डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले. ईतर जखमी यांचा उपचार मेडीकल ट्रॉमा सेंटर येथे सुरू आहे.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे वाठोडा येथे पोउपनि चाहाण यांनी आरोपी कार चालक नामे भुषण नरेश लाजेवार, वय २० वर्षे, रा. प्लॉट नं. १५, सेनापतीनगर, दहन घाटा जवळ, दिघोरी, नागपुर याचे विरुध्द कलम २७९, ३३७, ३३८, ३०४(अ) भा.द.वि., सहकलम १३४(अ) (ब) मोवा. का अन्वये गुन्हा दाखल करून, कार चालकास अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.