यवतमाळ :- राष्ट्रीय किशोवयीन स्वास्थ कार्यक्रमातंर्गत शंभर दिवस विविध आरोग्य विषयक कार्यक्रम राबविण्याच्या अनुषंगाने बाभूळगाव तालुक्यात ठिकठिकाणी सिकलसेल व हिमोग्लोबिन तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
बाभूळगाव येथील मातोश्री नानीबाई घारफळकर कनिष्ठ महाविद्यालय, शिवशक्ती कनिष्ठ महविद्यालय, प्रताप कनिष्ठ महाविद्यालय बाभुळगाव, तथागत विद्यालय, कोटंबा, स्व. रा. जा. उपाख्य बाबासाहेब घारफळकर, कनिष्ठ महाविद्यालय घारफळ येथे राष्ट्रीय किशोवयीन स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रूग्णालय बाभुळगाव यांच्याकडून किशोरयीन बालकांचे सिकलसेल व हिमोग्लोबिन चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिर ग्रामीण रूग्णालय बाभुळगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमा बाजोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यामध्ये किशोवयीन मुलांना पोषण आहार, सिकलसेल आजार बाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच हिमोग्लोबिन आपल्या शरीरात किती आणि कसे असावे याचेही मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरामध्ये महाविद्यालयातील एकुण 182 मुलांनी आपली हिमोग्लोबिन व सिकलसेल चाचणी करून घेतली. या कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन समुपदेशक पी. एन. वाकडे यांनी केले. शिबिरासाठी प्रयोगशाळा विभागाच्या ऋतुजा देशमुख, वेदांत मस्के, स्वराज खडसे, रोशन वायकर यांनी परिश्रम घेतले. कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले.