प्रभाग क्र 3 ची अर्धवट रखडलेल्या पाणी टंकी योजना पूर्णत्वास केव्हा येणार – माजी नगरसेविका रमा नागसेन गजभिये

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी नगर परिषद ला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियांन योजना अंतर्गत कामठी शहरात निर्माण करणाऱ्या तीन पाण्याच्या टाकी व पर्जन्य जलवाहिनी प्रकल्प हेतू चार वर्षांपूर्वी 5 मार्च 2019 ला मंजूर झालेल्या 21.82कोटी रुपयाच्या निधीतुन प्राप्त निधीतील पहिला टप्पा 5 कोटी 76 लक्ष 43 हजार शहरात तीन टंकी पाणी योजना सुरू करण्यात आली त्यानुसार कामठी नगर परिषदला प्राप्त प्रथम टप्पानुसार कामठी शहरातील अशोक नगर,कुंभारे कॉलोनी व इस्माईलपुरा येथे तीन टंकी पाणी योजनांच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली यामध्ये प्रभाग क्र 3 चा ही समावेश आहे मात्र आज चार वर्षे चा काळ लोटूनही दुसऱ्या टप्प्याचा निधी प्राप्त न झाल्याने मागील तीन वर्षांपासून या तीन टंकी पाणी योजनेचे बांधकाम अर्धवट असून रखडलेले आहे त्यामुळे प्रभाग क्र 3 येथील बी सी लाईन ,नागसेन नगर,येथील नागरिकांना भेडसावणारी पाण्याची टंचाई कायम असून उभारण्यात येणाऱ्या अर्धवट रखडलेल्या पाणी टाकी च्या बांधकामामुळे नागरिकांना मिळणारे 24 तास शुद्ध पाणी पुरवठा ही वलग्नाचं ठरत आहे तेव्हा प्रभाग क्र 3 मधील रखडलेले पाणी टंकी योजनेचे अर्धवट काम लवकरात लवकर पूर्णत्वास आणावे या मागणीसाठी माजी नगरसेविका रमाताई नागसेन गजभिये यांच्या नेतृत्वात कामठी नगर परिषद चे जलप्रदाय अभियंता अवी चौधरी यांना सामूहिक निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना लोकसेवक नागसेन गजभिये,सुधाकर खोब्रागडे,वनमाला खोब्रागडे,सुधीर खोब्रागडे,कुंजलता,हुमने, सुशिला वाघमारे,दामिनी वाघमारे,छाया बोरकर आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गुन्हेगारीला ब्रेक लागण्यासाठी पोलीस चौक्या सुरू होणे गरजेचे

Tue Jun 18 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या नवीन कामठी व जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत वाढती लोकसंख्या व गुन्हेगारीचा आलेख बघता कामठी शहरातील पूर्ववत बंद पडलेल्या पोलीस चौक्या नित्याने सुरू करणे गरजेचे आहे. याचबरोबर काही ठिकाणी नवीन पोलीस चौक्या सुरू कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मागील काही महिन्यापासून कामठी शहरात चोरीसह, घरफोडी तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com