संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- पारशिवनी तालुक्यातील पेंच, कन्हान व कोलार या तीन नदयाच्या संगमाजवळील जुनीकामठी येथील नदीकाठावरील श्री कामठेश्वर महादेव मंदिर परिसराची अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांनी पाहणी करुन कन्हान पोलीसांना आवश्यक सुचना केल्या.
कन्हान नदी मध्ये डावीकडुन पेंच आणी उजवी कडुन कोलार नदी समाविष्ट झाल्याने येथे तीन नदीचा त्रिवेणी संगम झाल्याने या निसर्गरम्य नदी काठावरील जुनीकामठी येथे रघुजी राजे भोसले हयानी कामठेश्वर महादेव मंदिराचे बांधकाम केले. हे कामठेश्वर शिव मंदिर ३३९ वर्षे जुने आहे. दरवर्षी महाशिवरात्री पर्वा वर श्री कामठेश्वर महादेव मंदिरात दर्शनाकरिता भावि कांची गर्दी असते. यावर्षी २६ फेब्रुवारी ला महाशिवरा त्री पर्वावर येथे मोठी यात्रा भरून महाशिवरात्री महो त्सव साजरा होणार आहे. या पार्श्वभुमीवर नागपुर ग्रामीण अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ, उपवि भागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील हयांनी जुनीकामठी येथील श्री कामठेश्वर मंदिर परिसराचा दौरा करुन मंदिर कमेटी आणि गावकरी नागरिकांशी संवाद साधला.
कन्हान नदी पात्राची केली पाहणी
महाशिवरात्री च्या पावन पर्वावर मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनाकरिता येत असल्याने मोठया यात्रे चे स्वरूप प्राप्त होत असते. दोन दिवस येथे येणारे भाविक भक्त कन्हान नदी पात्रात आंघोळ करून श्री कामठेश्वर मंदीरात मनोभावे दर्शनाचा लाभ घेतात. आंघोळ करताना अनेकदा भाविकांचा नदी पात्रात बुडुन मृत्यु झाल्याने परिसरात दु:खाचे वातावरण निर्मा ण झाले आहे. ही बाब गांभीर्याने लक्षात घेत अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांनी कन्हान नदी पात्राची पाहणी करुन कुठलीही अनुचित घटना घडु नये. यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना आवश्यक सुचना करून योग्य कारवाई चे आदेश केले.