दुचाकी चोर पोलिसांच्या ताब्यत

नागपुर – दि 15.04.22 चे 09ः30 वा. ते 17ः15 वा. चे दरम्यान खाजगी मेट्रो स्टेशन कडबी चौक, जरीपटका येथे फिर्यादी शंकर महादेव हांडे, वय 37 वर्ष  रा. राहनी सोसा. पांजरा यांनी त्यांची गाडी क्र. एमएच – 40/ए.एफ – 1098 हिरो होन्डा पॅशन प्रो काळया रंगाची लॉक करुन ठेवली होती. संध्याकाळी 17ः15 वा. चे सुमारास गाडीची पाहणी केली असता ठेवलेल्या ठिकाणी गाडी दिसुन आली नाही. असे फिर्यादीचे रिपोर्ट वरुन अज्ञात आरोपी विरुध्द पो.स्टे. जरीपटका येथे कलम 379 भादंवी. प्रमाणे गुन्हा नोंदविला होता.
वरिल गुन्हयाच्या तपासात  गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरुन आरोपी भानुदास वासुदेव बागडे, वय 34 वर्ष, रा. ज्ञानेश्वर नगर कॉलनी, मानकापूर, नागपूर यास ताब्यात घेवून त्याने दिलेली कबुली प्रमाणे त्याच्या कडून वाहन जप्त करण्यात आले.
सदरची कारवाई नागपूर शहराचे पोलीस उपायुक्त , परि. क्र. 5 मनिश कलवानीया, सहा.पोलीस आयुक्त (जरीपटका विभाग)  संतोश खांडेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन जरीपटकाचे वरिष्ट पोलीस निरीक्षक  संतोश बाकल, पो.नि. (गुन्हे)  गोरख कुंभार, सहा.पोलीस निरीक्षक राजकुमार त्रिपाठी, पोहवा बिंदाने, नापोशि गजानन, रामचंद्र, छत्रपाल, मनिश, नरेश, अमीत यांनी केलेली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com