प्राणांतीक अपघात करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- पोलीस ठाणे पारडी हहीत वार्ड क. २. कापसी बुजूर्ग, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे रोशन हरीभाऊ गजभिये वय ४० वर्ष रा. हे उमीया वसाहत कडे जाणाऱ्या रोडवर, पारडी, नागपूर येथे त्यांचा रोशन ढावा चालवितात. त्यांचे ढाब्यावर मागील तिन वर्षा पासुन रामु नावाचा ईसम वय अंदाजे ५० वर्ष हे काम करतात व ते तेथेच राहत होते. ते मुके असल्याने त्यांचे राहण्याच्या मुळ पत्ता कोणालाही माहीत नव्हता, दिनांक २७.०५.२०२४ मे २२.०० वा. चे सुमारास, रामु हे रस्त्याचे पलीकडे असलेला काकाचा ढाबा अॅण्ड फॅमेली रेस्टॉरन्ट समोरून पायदळ फिर्यादीचे डाब्याकडे परत येत असता, भंडाराकडे जाणाऱ्या रोडवर टिप्पर वाहन क. एम. एच ४० बी. एल ९६८८ चा चालक नामे गणेश उर्फ बादल महादेव उके वय २४ वर्ष रा. गोवरी, ता. मौदा, जि. नागपूर याने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन रामु यांना धडक दिली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले, त्यांना उपचाराकामी मेयो हॉस्पीटल येथे नेले असता, डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे पारडी येथे पोउपनि, शिंदे यांनी टिप्पर वाहन चालक आरोपी विरूध्द कलम २७९, ३०४(अ) भा.द.वि. सहकलम १३४, १८४, १७७ मो. वा. का अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

Tue May 28 , 2024
नवी दिल्ली :- थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय आज केंद्रात साजरी करण्यात आली. कॉपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात, निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रूपिंदरसिंग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रेरक प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com