नागपूर :- पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत सहा. वर्ग निबंधक, वर्ग २ कार्यालय, रेशीमबाग, नागपुर येथे फिर्यादी शकुंतला रामभाउ गुमगावकर वय ६७ वर्ष रा. प्लॉट नं. ६७९, तांडापेठ जुनी वस्ती, पाचपावली, नागपुर, यांना आरोपी क. १) गणपत विठोबा पौनीकर वय ५४ वर्ष रा. तांडापेठ जुनी वस्ती, पाचपावली, नागपुर २) किसन खावरदास सहजवानी नावाचा अनोळखी बनावट ईसम यांनी संगणमत करून, मौजा पिंपळधरा, प.ह.नं. ६३, हिंगणा, खसरा नं. १३० मधील, प्लॉ. नं. १ ते ११ एकुण १६,९३७, चौ. फुट किंमती ३३,८७,४००/- रूपयात घेण्याचा सौदा केला तसेच फिर्यादीकडून डिमांड नोट करीता ४४,०००/- रू व रजिस्ट्री खर्च ७,७७,०००/-रू असे एकूण ४२,५२,४००/- रू घेवून, फिर्यादी यांना आरोपी क. ०१ याने आरोपी क. ०२ हा जमीन मालक असल्याने खोटे सांगुन फिर्यादीस बनावट मुखत्यार पत्र दिले, तसेच प्लॉटच्या मुळ पावत्या व मुळ विषेश मुख्त्यारपत्र आरोपी क. ०१ याने स्वतःकडे ठेवुन फिर्यादीची फसवणुक केली. फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून व अर्जाचे चौकशी अंती आरोपी विरूष्द्र पोलीस ठाणे सक्करदरा येथे कलम ४०६, ४१९, ४२०, ४६८, ४७१, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेपासुन आरोपी हा मिळुन आला नव्हता. मा. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन नामंजूर केलेला होता.
आरोपीचा शोध लागत नसल्याने वरीष्ठांचे आदेशाने गुन्हयाचा तपास गुन्हेशाखा युनिट क. ४ यांना वर्ग करण्यात आला होता. पथकाचे पोउपनि वैभव बारंगे यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून तसेच तांत्रीक तपास करून गुन्हयातील आरोपी क. ०१ गणपत विठोबा पौनीकर हा शिवनी मध्यप्रदेश येथे असल्याचे निष्पन्न केले व तेथे जावुन, आरोपीचा शोध घेवुन, त्यास ताब्यात घेतले. आरोपीचे ताब्यातुन १ मोबाईल फोन व अॅक्टीवा क. एम.एच.४९ बी.एफ. ९४६५ असा एकूण ६०,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपुर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपुर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली, पोनि, कमलाकर गड्डीमे पोउपनि वैभव बारंगे, पोहवा. सतीष ठाकरे, निलेश ढोणे, अभिषेक शनिवारे, पुरूषोत्तम जगनाडे, पुरुषोत्तम काळमेघ महेंद्र करींगवार, नाझीर शेख, पोअ, महेश काटवले, यांनी केली.