नागपूर :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पोलीस स्टेशन कोंढाळी अप. क्र. ५५१/२०२४ कलम ३०३ (२) BNS चे गुन्हाचे तपासात आरोपी शोध करीत असता गोपनीय बातमीदारा कडून मिळालेल्या माहिती वरून व तांत्रिक माहिती वरून आरोपी क्रं. १) अनिल सुरेश शाहू वय २८ रा. कळमना नागपूर हा असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने आरोपींचा शोध घेतला असता आरोपी क्र. १ हा कळमना नागपूर येथे मिळून आल्याने त्याला सदर गुन्ह्यावाचत विचारपूस केली सदर गुन्हा तसेच भिवापूर येथुनही साथीदार नामे-२) बरदिन मोहनलाल यादव वय २८ वर्ष, रा कळमना नागपूर ३) जितेंद्र उर्फ वऊवा गुलाबसींग यादव वय २८ रा भिलगाव नागपूर ४) अमोल राजेश उगले वय २४ रा कळमना नागपूर ५) फरार नरेश तुरनकर रा. बुट्टीबोरी ६) फरार प्रमोद प्रजापती रा कळमना नागपूर यांचे मदतीने पोल चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याचे गुन्ह्यातील सहभागी साथीदार यांना ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातुन एक लहान मोठे आकाराचे पोलचे तुकडे वजन अंदाजे ३००० kg की अंदाजे ९०,००० रू २) वेगवेगळ्या कंपनीचे ४ मोवाईल किंमती ४०,००० रु. ३) एक टाटा इन्ट्रा मालवाहतूक वाहन क्र. MH 49 BZ 1773 की. ४,०००००रू- रु ४) एक अशोक लेलैंड कंपनीचा मालवाहतूक वाहन क्र. MH 49 BZ 2674 की. ४,०००००रू असा एकूण मुद्देमाल ९,३०,००० रू चा दोन्ही गुन्ह्यातील चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच यातील नमूद आरोपी याची मेडिकल तपासणी करून पो.स्टे. कोंढांळी यांचे ताब्यात पुढील कार्यवाही कामी देण्यात आले.