नागपूर :- निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आंबेडकर जयंती पंर्यत अंबाझरी डॉ आंबेडकर भवनाचे काम तातडीने पूर्ण करण्याची जबाबदारी सत्तेवर असलेल्या मंडळीने घ्यावी अन्यथा येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत परिणामाला तयार राहा असा ठोक सवाल आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केला. ते आज पुर्व नागपूरातील हिवरीनगर येथील तथागत बौद्ध विहार परिसरातील बौद्ध विहार पटांगणात आयोजित सत्यशोधक अभियानाच्या पांचव्या टप्प्याच्या प्रारंभ करताना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुर्व नागपूर आंविमो चे अध्यक्ष रामभाऊ वाहणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सत्यवान मेश्राम, जयदेव चिंवडे, अनु वाहने, रंगारी, वैशाली तभाने हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची पाटील यांनी केले. याप्रसंगी अंबाझरी डॉ आंबेडकर भवनासाठी संघर्षशिल असलेल्या महिलांना माई रमाई त्याग मूर्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमात गरोबा मैदान, नंदनवन, हिवरी नगर,पारडी, बगडगंज परिसरातील महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वैशाली तभाने यांनी केले.