अवैध वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात होणार पोलिस तक्रार – महापौर दयाशंकर तिवारी यांचे निर्देश

नागपूर  : नागपूर शहरात होणाऱ्या अवैध वृक्षतोडीविरोधात मनपाने कठोर पाउल उचलले आहे. अवैधरित्या झाडांच्या फांद्या तोडणे, वृक्ष तोड करणाऱ्यांविरोधात नागपूर महानगरपालिकेतर्फे पोलिस तक्रार करण्यात येणार आहे. यासंबंधी मंगळवारी (ता.४) महापौर दयाशंकर तिवारी यांनी प्रशासनाला सक्त निर्देश दिले असून ज्या प्लॉटमध्ये व इतर ठिकाणी अवैधरित्या वृक्षतोड झाल्याचे निदर्शनास आले आहे त्यांच्याविरोधातही पोलिस तक्रार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच उपद्रव शोध पथक सुध्दा याबद्दल कारवाई करणार आहे.

नागपुरात वृक्षाची अवैध कटाई करणाऱ्या टोळी मार्फत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याची तक्रार ग्रीन व्हिजील फाउंडेशनतर्फे महापौर कार्यालयात करण्यात आली. यावर गंभीरतेने  लक्ष देत महापौरांनी ग्रीन व्हिजिल फाउंडेशन आणि अधिकाऱ्यांची बैठक त्यांचा कक्षात आयोजित केली होती. या बैठकीत ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपायुक्त रवींद्र भेलावे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, ग्रीन व्हिजीलचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल,  मेहुल  कोसुरकर उपस्थित होते.

ग्रीन व्हिजीलचे कौस्तुभ चॅटर्जी यांनी यावेळी सांगितले की, नागपुरात मोठ्या प्रमाणात वृक्षांची अवैध कटाई करणारी टोळी फिरत आहे. ते कमी किंमतीत झाडे कापतात आणि लाकडे आपल्या सोबत घेउन जातात. यांच्या विरोधात कारवाई करणे गरजेचे आहे.

उपायुक्त रवींद्र भेलावे यांनी नागपूर महानगरपालिकेतर्फे अवैध वृक्ष कटाईच्या विरोधात पोलिस तक्रार करण्यात येत असून त्याविरोधात सक्त पोलिस कारवाई होत नसल्याचे सांगितले. या बद्दल पोलिस स्टेशनमध्ये पत्र सुद्धा पाठविण्यात आले असल्याचे ते म्हणाले. नागरिकांना वृक्षांची छाटणी करायची असेल तर त्यांनी मनपाच्या झोन कार्यालयात रितसर अर्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना परवानगी देण्यात येते, असेही त्यांनी सांगितले.

अवैधरित्या वृक्षांची कटाई करणाऱ्या टोळीसह अवैधरित्या वृक्षांची कटाई करून घेणाऱ्या प्लॉटधारकाच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. अवैध वृक्ष कटाईच्या विरोधात कारवाई न करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची व अधिकारी यांची तक्रार पोलिस आयुक्तांकडे करण्याचे सुद्धा सक्त निर्देश महापौरांनी दिले. या विषयाच्या अनुषंगाने  मनपा आणि पोलिस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पुढच्या आठवड्यात बोलविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. उद्यान विभागाने प्रत्येक महिन्याला अवैध कटाईबाबत आढवा बैठक घ्यावी व अवैध कटाई थांबविण्याकरीता यंत्रणा तयार करण्याचे ही निर्देश महापौरांनी यावेळी दिले.

 

झोन समन्वयकांची यादी

अ.क्र. झोनचे नांव झोन समन्वयक कर्मचारी
लक्ष्मीनगर झोन क्र.०१ श्री.राहूल खोब्रागडे

मो.नं. 8554990471

धरमपेठ झोन क्र.०२ श्री. गणेश वंजारी

मो.नं. 9370592325

हनुमाननगर झोन क्र.०३ श्री. प्रदिप मिश्रा

मो.नं.9503628421

धंतोली झोन क्र.०४ श्री. संदिप सेलोकर

मो.नं.9923311923

नेहरुनगर झोन क्र.०५ श्री. मोहीत वासनिक

मो.नं.8600666977

गांधीबाग झोन क्र.०६ श्री. मयंक धुरीया

मो.नं. 7066266097

सतरंजीपूरा झोन क्र.०७ श्री. विक्रम पाठराबे

मो.नं. 7798411671

लकडगंज झोन क्र.० ८ श्री. सत्यवान मानमोडे

मो.नं. 9922479671

आशीनगर झोन क्र.०९ श्री. देविदास भिवगडे

मो.नं. 9373029403

१० मंगळवारी झोन क्र.१० श्री. प्रेमचंद तिमाने

मो.नं. 8999613809

 

-दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

छात्रावास निर्माण में बिना रॉयल्टी के गौण खनिज का उपयोग 

Wed Jan 5 , 2022
– सरकार को लगा करोड़ो चुना ? -सुरेंद्र नाईक ने तहसीलदार से की निर्माणकार्य में लगे खनिजों की ऑडिट करवाने की मांग अन्यथा न्यायालय जाने की चेतावनी दी | सावनेर – राज्य के सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग की योजना के अंतर्गत पिछड़ी जाति के विद्यार्थियों के लिए पिछले 2 साल से सावनेर में निर्मित हो रही छात्रावास में […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com