गोंदिया जिल्हात आजच दुसरी कारवाई 7 हजारांची लाच घेताना तलाठी बनोटे ACB च्या जाळ्यात

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

गोंदिया :- तक्रारदार लहिटोला येथील असुन प्लांट फेरफार करण्यासाठी तलाठी कार्यालय मुर्री तालुका गोंदिया येथे गेला असता फेरफार करून देण्यासाठी तलाठी याने 8 हजार रूपयांची मागणी केली होती. तडजोड करुण 7 हजार रूपयांची लाच स्वीकारताना मुर्री तलाठी याला आज रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

तक्रारदार यांचे मालक ज्यांचे तर्फे तक्रारदार अधिकारपत्रान्वये काम पाहत होते. त्यांच्या नावे असलेल्या प्लांट फेरफार करण्यासाठी तलाठी कार्यालय मुर्री सांजा क्रमांक 42 तालुका गोंदिया येथे गेले असता तलाठी बालाराम बनोटे यांने प्लांट फेरफार करण्यासाठी 8 हजार रूपयांची मागणी केली होती. तक्रारदार याला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
शेवटी आज 29 जुलैला तक्रारदाराने तलाठी बालाराम बनोटे याला तळजोड करित 7 हजार रूपयांची लाच दिली. रक्कम स्वीकारताना सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले. आरोपी तलाठी विरूद्ध शहर पोलीस स्टेशन गोंदिया येथे गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.

सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागचे राकेश ओला, पोलिस अधीक्षक , मधुकर गिते अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुषोत्तम अहीरकर उप अधीक्षक सह कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कन्हान पोलीस स्टेशन शहरा बाहेर स्थलांतरीत न करता शहरातच कायम बनविण्यात यावी

Fri Jul 29 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी दुकानदार महासंघाचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पोलीस अधिक्षकाना निवेदन. पोलीस स्टेशन बाहेर स्थलांतरीत न करता शह रातच नवीन इमारत एका वर्षात पुर्ण करा बावनकुळे चे पोलीस अधिक्षकाना आदेश. कन्हान : – शहरातील गांधी चौक येथे मागील ४० वर्षापासुन भाड्याने कन्हान पोलीस स्टेशनचे असुन शहरात व परिसरात मागील काही दिवसा पासुन चोरी, घरफोडी, अवैध कोळसा, रेती, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com