राज्यपालांच्या दुरस्थ उपस्थितीत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा ४० वा दीक्षांत समारंभ संपन्न

मुंबई :- राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या दुरस्थ उपस्थितीत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा चाळिसावा दीक्षांत समारंभ विद्यापीठ परिसर, अमरावती येथे संपन्न झाला. 

दीक्षांत समारोहाला विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. दीपक कुमार श्रीवास्तव, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर तसेच विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक तसेच स्नातक विद्यार्थी उपस्थित होत़े. दीक्षांत समारंभामध्ये ४१,११३ स्नातकांना पदव्या व २४४ विद्याथ्र्यांना पदविका प्रदान करण्यात आल्या. 

या दीक्षांत समारंभात गुणवत्ताप्राप्त १६४ स्नातकांना सुवर्णपदके, रौप्यपदके व रोख पारितोषिके देण्यात आली तर २१५ संशोधकांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपात संत रविदास यांना विनम्र अभिवादन

Sun Feb 25 , 2024
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि चर्मकार सेवा संघ यांच्या वतीने श्री. संत रविदास यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयातील दालनात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, अमोल तपासे, जांभुळकर, चर्मकार सेवा संघाचे सर्वश्री अध्यक्ष भैय्यासाहेब बिघाने, कार्याध्यक्ष पंजाबराव सोनेकर, भाऊराव तांडेकर, माणिकराव रामेकर, महादेवराव बोडखे, मनोज बिंझाडे, कृष्णा भोंडेकर, रमेश सटवे, संतोष चांदेकर, सुखदास अहिरकर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com