कन्हान परिसरात वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्या वर अंकुश लावण्याची मागणी

सात दिवसाचा आत कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करू – अतुल हजारे 

भाजपा पदाधिका-यांचे पोलीस निरीक्षका मार्फत पोलीस अधिक्षकांना निवेदन. 

कन्हान :- शहरात व ग्रामिण भागात दिवसे दिवस गुन्हेगारी आणि अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बिनधास्त सुरू असुन शांती सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने भाजपा पारशिवनी तालुका पदाधिका-यानी सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलझले यांची भेट घेऊन चर्चा करित निवेदन देत कन्हान परिसरात वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्यावर अंकुश लावण्याची मागणी केली आहे.

कन्हान, कांद्री, टेकाडी (को.ख) परिसरात मागिल एका वर्षा पासुन गुन्हेगारी व अवैध धंद्यांचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले असुन कन्हान पोलीस प्रशासनाच्या निष्काळजीने कुठलिही कारवाई होत नसल्याने सामान्य नागरिकांना, व्यावसायिकांना गाव गुंडांच्या त्रासाने भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने जीवन जगणे कठीण झाले आहे. या बाबत विविध संघटनेद्वारे वारंवार तक्रार करून आणि निवेदन देऊन ही गुंड प्रवृत्तीचे गुन्हेगार पोलीस प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा हे गावगुंड करत आहे. त्यात अल्पवयीन गुन्हेगार दिवस रात्र दारू- गांज्या, विविध नशा करून सामान्य नागरिकांना चाकुचा धाक दाखवणे, व्यावसायिकांकडुन अवैध वसुली करून जीवे मारण्याच्या धमक्या देणे, चाकु, कट्टे असे घातक शस्त्र घेऊन परिसरात शांती सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. गावगुंडां कडुन गेल्या काही दिवसा पासुन बेकायदेशीर गुन्हे घडवुन आल्यावरही यांना पोलीस प्रशासनाचा कुठलाही धाक दिसत नसुन दिवसेंदिवस गावगुंडांची हिम्मत वाढलेली आहे. त्यामुळे आता पर्यंतच्या पहिल्या घटनांच्या तपासातील गावगुंडांचा शोध घेऊन तात्काळ त्यांच्यावर न्यायालयीन कारवाही करावी. या गावगुंडांवर वचक ठेवणे, रात्रीची पोलीस गस्त वाढविणे. असे लिखित निवेदने दिल्यावर ही पोलीस प्रशासन त्यावर कुठल्याही प्रकारची अंबलबजावणी न केल्याने या गावगुंडांच्या रोजच्या हरकती वाढल्याने नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झाल्याने भाजपा पारशिवनी तालुका पदाधिका-यांनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे यांचा नेतृत्वात कन्हान सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलझले यांची भेट घेऊन चर्चा करून त्याचे मार्फत पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण यांना निवेदन देऊन परिसरातील वाढत्या गुन्हेगारी व अवैध धंद्यावर सात दिवसाच्या आत अंकुश लावण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक, रिंकेश चवरे,अविनाश कांबळे, मोती हारोडे, कामेश्वर शर्मा, सौरभ पोटभरे, लोकेश आंबाळकर, प्रतिक्षा चवरे, मिना कळंबे, सचिन वासनिक, लीलाधर बर्वे, शैलेश शैळके, मयुर माटे, ऋषभ बावनकर, रवि महाकाळकर, अमोल साकोरे, मनोज लगे, बंटी यादव, शुभम यादव, प्रविण सिंग, चिंतामण सार्वे, चंद्रशेखर चिकटे सह भाजपा पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तुम्ही तुमच्या बाळाला गोवरची लस दिली का ? गोवर लसीकरणासंदर्भात मनपात जनजागृती बैठक 

Thu Dec 8 , 2022
– धर्मगुरू,एनजीओ व युनानी डॉक्टरांना दिली माहिती नागपूर :-  राज्यात काही भागात गोवर (मीझल्स) ची साथ पसरत असल्याने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गोवर संसर्गापासून सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर शहरातील बालकांचे प्रतिबंधात्मक लसीकरण अभियान राबविण्यात आहे. या अभियानाला अधिक गती मिळावी याकरिता मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील बैठक कक्षात गोवर लसीकरणासंदर्भात जनजागृती बैठक घेण्यात आली. बैठकीत शहरातील विविध अशासकीय सामाजिक संस्था, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com