श्री नागद्वार यात्रा १ ते १० ऑगस्ट पर्यंत मध्य प्रदेश सरकारकडून दहा दिवसांची परवानगी

नागपूर :- महादेव मेला समिती, पचमढ़ी आणि श्री महादेव तथा नागद्वार यात्रा बचाव समिती यांची संयुक्त बैठक पचमढ़ी मध्यप्रदेश येथे योनीया मीना, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ८-७-२०२४ ला ठिक १२.०० वाजता संजय गांधी संस्था सभागृह, पचमढ़ी येथे घेण्यात आली. सभेला प्रामुख्याने सुजानसिंग राऊत, जिल्हा पंचायत अधिकारी,कृष्णमुर्ति खान D.F.O.,आशुतोष मिश्रा एस.पी., उमाशंकर यादव रेन्जर, संजय शर्मा एस.डी.ओ., संतोष तिवारी एस.डी.एम., तहसिलदार यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली.

सभेला जिल्हाधिकारी मीना यांनी संबोधन करून २०२४ ची नागद्वारी यात्रा दिनांक ०१-०८-२०२४ ते १०-०८-२०२४ पर्यंत मंजूर करण्यात आली. श्री महादेव तथा नागद्वार यात्रा बचाव समितीचे महासचिव रविंद्र ठाकरे यांनी नागद्वारी यात्रेत येणाऱ्या समस्या अडचणी व सुविधांचा अभाव समजाऊन सांगीतला व सभेत अडचणी व समस्या दूर करण्याकरिता विचार विनिमय करून जास्तीत जास्त सुविधा व समस्या दूर करण्याचे आश्वासन मंजुर केले. मान्यवरांचे शाल, श्रीफळ व फुल गुच्छे देऊन समितीने स्वागत केले.

सभेला नागद्वर स्वामी यात्रा बचाव कृती समितीचे ५५ मंडळ उपस्थित होते. तसेच यात्रा बचाव समितीचे आशिष कावळे, रविंद्र ठाकरे, गजेंद्र अखंड, हिरामण शेंडे, हरीश टेटे, राकेश येरपुडे, रामाजी खेरडे, रामभाऊ जुनघरे, दिपक देशमुख, कमलाकर सुर्यवंशी, गजानन चौधरी, गिरडकर, दिनेश वाकुळकर, गौरव गौरकर उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महा मेट्रो और विदर्भ लिटररी फेस्टिव्हल कि ओर से "मेरा नागपुर मेरी मेट्रो" निबंध प्रतियोगिता का आयोजन

Tue Jul 9 , 2024
*महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड* (नागपुर मेट्रो रेल परियोजना) नागपुर :- महा मेट्रो और विदर्भ लिटररी फेस्टिव्हल कि ओर से निबंध प्रतियोगिता का आयोजन किया गया है ! इस निबंध प्रतियोगिता का विषय “मेरा नागपुर मेरी मेट्रो” है ! मेट्रो ने आपके जीवन को कैसे प्रभावित किया है या आप इसे नागपुर के भविष्य को कैसे आकार देते हुए देखते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com