महामार्गावरील डूमरी पंप जवळील यश धाबा येथील कर्मचा-यांनी केली युवकाची हत्या 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

महिन्याचा आत दुसरी हत्येची घटना, कन्हान पोलीसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह. 

कन्हान :- नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरील डुमरी खुर्द येथील पेट्रोल पंपच्या बाजुला असलेल्या यश ढाबा च्या कर्मचा-याने आपसी भांडणात एका युवकाची धारदार शस्राने हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असुन एका महिन्याच्या आत दुसरी हत्येची घटना घडल्याने कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे व पोलीस कर्मचा-यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. सतत परिसरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिकात असुरक्षिता भासत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बुधवार (दि.५) ऑक्टोंबरला नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील डुमरी खुर्द हिंदुस्थान पेट्रोल पंपवर कार्यरत पेट्रोल, डिझेल सेलस मँन आकाश तिलकचंद टिकम हा कामावर असताना गुरूवार सकाळी पहाटे ३.३० ते ४ वाजता दरम्यान अंधारात ओये ओये ओरडण्याचा कुणातरी आवाज आल्याने आकाश ने त्याचे सहकर्मी विक्रम बल्हारे, करण ओमेकर, दिनेश सरीले, सुधाकर पडोळे तसेच सप्रा टॉन्सपोर्ट चे सुपर वाईझर राहुल मालविये यांना उठवुन मोबाईलच्या टार्च ने पाहत असताना पंप सामोर असलेल्या पान टपरीच्या टेबल जवळ एक इसम मृत अवस्थेत पडलेला असुन त्याच्या डोक्यातुन व शरिरातुन रक्त निघलेले दिसल्याने त्यानी लगेच १०० नंबर वर पोलीसाना, यश सावजी ढाबा मालक विलास सोमकुवरला माहीती देऊन गावातील लोकांना फोन करून बोलाविले असता बाजुच्या यश सावजी ढाबातुन कर्मचारी अमन अशोक श्रीवास्तव वय २२ वर्ष हा बँग भरून बाहेर जाताना दिसल्याने त्यास पकडुन ठेवले. तेवढयातच कन्हान पोलीस स्टेशनचे पो. ह.अरूणकुमार सहारे, मंगेश सोनटक्के हे आपल्या सहकर्मी सह घटनास्थळी पोहचल्याने अमन अशोक श्रीवास्तव ला विचारपुस केली असता त्यांनी मुतक राजु दुबे वय ४५ वर्ष धाब्याचाच कर्मचारी असुन आम्हचे आपसात दारू पिण्याच्या व जेवणावरून भांडण झाल्याने मी लोखंडी धारदार वस्तुने राजु दुबेच्या शरीरावर व डोक्याच्या मागील भागात मारून त्यास जिवानिशी ठार करून हत्या केल्याचे सांगितले. आरोपी अमन श्रीवास्तव यास ताब्यात घेत घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आला. कन्हान पोलीसांनी आरोपी अमन अशोक श्रीवास्तव विरूध्द कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करून त्यास अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. घटनेचे गांभीर्याने लक्षात घेत उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान व कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी सकाळी घटना स्थळी भेट दिली. सतत कन्हान परिसरात वाढत असलेले अवैध कोळसा, रेती चोरी, घरफोडी, लुटमार, मारामारी, शेती सामान, जनावरे व इतर चो-या, अवैध दारू, नशिले पदार्थाची बिनधास्त विक्री आणि मोठया प्रमाणात अवैध धंदे सुरू झाल्यामुळे गुन्हेगारी दिवसेदिवस वाढत असुन कन्हान पोलीसाच्या ऑटोक्याबाहेर होत पोलीस प्रशासनाचा कसलाही अंकुश नसल्याने महिन्याच्या आत दुस-या युवकाची हत्येने नागरिकांत चांगलीच खळबळ उडत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने कन्हान पोलीसस्टेशनला तात्काळ कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करून शांती सुव्यवस्था कायम करण्याची मागणी आता सर्वसामान्य नागरिकात जोरधरू लागली आहे.

NewsToday24x7

Next Post

सिहोरा रेती घाटातुन अवैध वाळु वाहतुक करणारे ट्रॅक्टर ट्राली पकडली

Fri Oct 7 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  ट्रक्टर चालक विधी संघर्ष बालक असुन ७ लाख ३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. कन्हान :- पारशिवनी तालुक्यातील खंडाळा शिवारातिल गावातील रस्त्यावर अवैधरित्या वाळु वाहतुक करणारा ट्रॅक्टर ट्राली पोलीस निरिक्षक विलास काळे सह सहकर्मी ने रात्री विभागीय गस्त (पैट्रोलिग) करित असताना पहाटेच्या सुमारास पकडुन ट्रक्टर चालक विधी संघर्ष बालक असुन सात लाख तीन हजार रूपयाचा मुद्देमाल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com