चंद्रपूर १५ नोव्हेंबर :- चंद्रपूर महानगरपालिका सावित्रीबाई फुले शाळेमध्ये १४ नोव्हेंबर रोजी बालक दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थांच्या कलाविष्काराला व्यवहारीक ज्ञानाची जोड होण्यासाठी सर्व शाळांमध्ये बाल आनंद मेळावा दुपारी १२ ते २ दरम्यान आयोजित करण्यात आला.
सदर मेळाव्यांचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम भारतरत्न पंडित जवारलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांनी मनपा शाळांमध्ये चालणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले तसेच शाळेची पाहणी करून विद्यार्थ्यांना भेट देऊन मार्गदर्शन केले.
मेळाव्यास विद्यार्थ्यांनी आपल्या घरून विविध पदार्थ बनवुन आणले व पदार्थांची मेळाव्यात विक्री केली. विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी विविध मेनुचे स्टॉल मेळाव्यात लावले होते. बाल आनंद मेळाव्याला पालक शिक्षक आणि विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. वेगवेगळे चवींचे पदार्थ खाऊन विद्यार्थ्यांनी मेळाव्याचा आनंद घेतला. सदर बाल आनंद मेळाव्यांचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक नागेश नित यांच्या मार्गदर्शनात आणि मनपा शाळा शिक्षकांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडले.