संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मुस्लिम समाजबांधवांचा पवित्र सण रमजान ईद पाश्वरभूमीवर कामठीतील बाजारपेठेत दुकाने सजली असून खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे. कापड दुकानासह सुकामेव्यांची दुकाने गर्दीने फुलली आहेत रमजान निमित्त शेवयांना सर्वाधिक मागणी असून त्याखालोखाल काजू,बदाम, मनुके असा सुकामेवा खरेदी करताना दिसत आहेत.
मुस्लिम बांधवांच्या रमजान या पवित्र महिन्यात रोजा म्हणून अत्यंत कडक उपवास पाळले जातात .या महिन्यांमध्ये सुकामेवा,मिठाई,फळे,खजूर यांची मागणी वाढली आहे. रमजान ईदचे वैशिष्ट्य असलेल्या शिरखुर्म्यासाठी विविध प्रकारच्या शेवया खरेदी केल्या जात आहेत.त्याशिवाय बदाम,पिस्ता,काजू,खोबरा किस,इलायची ,मनुका यांनाही मागणी आहे.रमजान ईद सणासाठी रेडिमेड कपड्यांची खरेदी करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे यामुळे मुस्लिम बांधवामध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
रमजान महिन्यात संपूर्ण तीस दिवस रोजा धरल्या नंतर शनिवारी रमजान ईद साजरी होणार आहे.या ईदनिमित्त शहरातील बाजारपेठेत विविध सामान घेण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होत आहे. ईदची मिठाई, ड्रॅआयफुट,शेवया यासह घरातील सर्वांसाठी नवे कपडे आणि इतर लहान सहान म्हत्वाच्या वस्तू आणण्यासाठी बजारपेठेत लोकांची गर्दी आहे. विशेषता महिलांसाठी असलेल्या कपडे खरेदी विक्री दुकानासोबत ,सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानावर चांगलीच गर्दी होती.