
नागपूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सिव्हिल लाईन्समधील हिस्लॉप कॉलेजजवळ सैनिकी मुलांचे वसतिगृहाकरीता माजी सैनिक प्रवर्गातून अशासकीय निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात एकत्रीत मानधन 23 हजार 283 रुपये प्रमाणे कंत्राटी पध्दतीने सहाय्यक वसतिगृह अधीक्षकाचे एक पद 175 दिवसाकरीता भरावयाचे आहे.
पदासाठी इच्छुक माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 5 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता सैन्यसेवेतील संपूर्ण मूळ आणि छायांकित कागदपत्रासह मुलाखतीकरीता हजर राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यांनी केले आहे.

अशासकीय सहाय्यक वसतिगृह अधीक्षक यापदाकरीता सैन्यातील हवालदार किंवा त्यापेक्षा वरील हुद्यांवर काम केलेल्या संवर्गातून निवड केल्या जातील.

@ फाईल फोटो